अभिनेत्रीपेक्षा कमी सुंदर नाही समीर परांजपेची पत्नी; पाहा त्याच्या लग्नाचा अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 09:00 IST2022-02-12T09:00:00+5:302022-02-12T09:00:00+5:30

Sameer Paranjape: अनुजा दिसायला प्रचंड सुंदर आहे. मात्र,तिचा सोशल मीडियावर फारसा वावर नसल्याचं पाहायला मिळतं.

छोट्या पडद्यावरील 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे समीर परांजपे.

या मालिकेत समीर, अभिमन्यु ही भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे उत्तम अभिनयासोबतच गुड लुकिंग असल्यामुळे आज अभ्या असंख्य तरुणींच्या गळ्यातलं ताईत झाला आहे.

कलाविश्वाप्रमाणेच समीर सोशल मीडियावरही सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. यात अनेकदा तो सेटवरील किंवा त्याच्या फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करत असतो.

अनेकदा समीर त्याच्या कुटुंबासोबतचे काही खास फोटो शेअर करत असतो. यामध्येच त्याच्या लग्नाचे काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

समीरच्या बायकोचं नाव अनुजा परांजपे असं आहे.

अनुजा आणि समीर यांची कॉलेजमध्ये असल्यापासून एकमेकांसोबत ओळख होती.

अनुजा आणि समीर यांनी २७ नोव्हेंबर २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यापूर्वी ३ वर्ष ते एकमेकांना डेट करत होते.