"आईवडील सतत भांडायचे, मला मारायचे अन् भाऊ दीपक चहर तर..." मालती चहरचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 14:00 IST2025-12-28T13:50:47+5:302025-12-28T14:00:30+5:30
मालती चहरचं बालपण अतिशय ट्रॉमामध्ये गेलं, म्हणाली, "गेल्या १३ वर्षांपासून..."

भारतीय क्रिकेटपट दीपक चहरची सख्खी बहीण मालती चहरने इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मालती नुकतीच 'बिग बॉस १९'मध्ये दिसली.

'बिग बॉस'मधला मालतीचा प्रवास सगळ्यांनीच पाहिला. तिची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. स्टॅण्डपण कॉमेडियन प्रणित मोरेसोबत तिची मैत्री खूप गाजली.

बिग बॉस संपल्यानंतर मालतीने एका मुलाखतीत वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला. तिचं बालपण कसं ट्रॉमामध्ये गेलं हे तिने सांगितलं.

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत मालती म्हणाली, "माझ्या आई वडिलांचं एकमेकांशी अजिबात पटायचं नाही. ते नेहमीच भांडत असायचे. मी घरातली मोठी मुलगी असल्याने मी ते सगळं जवळून पाहिलं."

"माझा भाऊ दीपकने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्यामुळे तो नेहमीच घरातील तणावापासून दूर असायचा. मी वडिलांना एक दिवस सांगितलं की मला ब्युटी पेजेंटमध्ये भाग घ्यायचा आहे आणि फिल्म इंडस्ट्रीत जायचं आहे.

"पण त्यांना मी आयपीएस अधिकारी व्हावं असं वाटत होतं. मी या सगळ्यापासून दूर राहून फक्त अभ्यासावर लक्ष द्यावं. मला ११ वीपर्यंत छोटे केस ठेवावे लागले. कोणतंही स्वातंत्र्य मिळायचं नाही. याचा माझ्यावर खूप परिणाम झाला."

"आम्ही १ बीएचके फ्लॅटमध्ये राहायचो. त्यात जर तुमचे आईवडील सतत भांडत असतील तर तुम्ही कुठे जाणार? बऱ्याचदा माझ्या वडिलांचं आईशी भांडण झालं की आई येऊन मला मारायची. कधी कधी बाबाही मला मारायचे."

"याचा माझ्यावर काय परिणाम होत असेल याची त्यांना कधी जाणीवही झाली नाही. त्यांच्यामध्ये कंपॅटिबिलिटी इश्यू होते आणि गेल्या १३ वर्षांपासून ते वेगळे राहत आहेत."

















