कतरिना आणि विकीनं साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी, अभिनेत्रीचा देसी लूक चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 16:33 IST2022-10-25T16:26:14+5:302022-10-25T16:33:07+5:30
Katrina Kaif And Vicky Kaushal : बॉलिवूड कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली.

बॉलिवूड कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली. (फोटो: इंस्टाग्राम)
कतरिना कैफने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर लक्ष्मी पूजन आणि दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये कतरिना कैफ सोनेरी रंगाच्या साडीत तर विकी कौशल पांढऱ्या कुर्ता पायजमामध्ये सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये कतरिना विकीचा हात धरताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हा फोटो शेअर करत विकीने कॅप्शनमध्ये लिहिले - 'घरच्या लक्ष्मीसोबत लक्ष्मीपूजन झाले. आमच्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.' (फोटो: इंस्टाग्राम)
कतरिना कैफचे हे फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
कतरिना कैफ आणि विकी कौशलचे हे फोटो चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)