ना धर्मेंद्र अन् जयदीप अहलावतही नाही! 'इक्कीस'साठी 'या' अभिनेत्याने घेतलं तगडं मानधन, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:54 IST2025-12-30T15:26:57+5:302025-12-30T15:54:24+5:30
धर्मेंद्र ते अगस्त्य नंदा 'इक्कीस' साठी कोणी किती घेतलं मानधन; 'या' अभिनेत्याला मिळालं सर्वाधिक मानधन, कोण आहे तो?

हिंदी कलाविश्वात सध्या मॅडॉक फिल्म्सच्या आगामी इक्कीस या सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित या सिनेमात धर्मेंद्र, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि जयदीप अहलावत प्रमुख भूमिकेत आहेत.

या चित्रपटात अभिनेते धर्मेंद्र शेवटचे झळकले. त्यामुळे हा चित्रपटाचं प्रेक्षकांशी भावनिक कनेक्शन निर्माण झाल्याचं दिसतंय. या सिनेमाद्वारे भारतीय सेनेच्या शौर्याची आणि अरुण खेत्रपाल यांच्या बलिदानाची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

इक्कीस हा बहुचर्चित चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील 'बसान्तरच्या लढाई'वर आधारित आहे. या युद्धात २१ वर्षीय सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांनी शौर्य दाखवून परमवीर चक्र मिळवले होते.

1 जानेवारी 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. श्रीराम राघवन यांच्या या चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं, जाणून घेऊ...

दिवंगत अभिनेते यांचा हा शेवटचा चित्रपट आहे.वृत्तानुसार, धर्मेंद्र यांना त्यांच्या शेवटच्या चित्रपटासाठी मानधन म्हणून २० लाख रुपये देण्यात आले होते. जे तुलनेने फार कमीच आहे.

अगस्त्य नंदा
अमिताभ आणि जया बच्चन यांचा नातू, अगस्त्य नंदा, 'इक्कीस' या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.याआधीही त्याने द आर्चिज या चित्रपटात काम केलं आहे. पण, हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे.मीडिया रिपोर्टनुसार, अगस्त्याला या चित्रपटासाठी सर्वाधिक ७० लाख रुपये मानधन घेतलं आहे.

जयदीप अहलावत
बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक मानला जाणारा जयदीप अहलावत 'इक्कीस' या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला या चित्रपटासाठी ५० लाख रुपये मानधन देण्यात आले आहे.

सिमर भाटिया
'इक्कीस' या चित्रपटात अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिमरने या चित्रपटासाठी ५ लाख रुपये मानधन घेतल्याची माहिती मिळते आहे.

















