रुबिनाच्या धाकट्या बहिणीने उरकला साखरपुडा; पाहा ज्योतिकाच्या engagement चे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 04:45 PM2021-11-07T16:45:00+5:302021-11-07T16:45:00+5:30

Rubina dilaik: साखरपुड्यासाठी ज्योतिकाने खास लव्हेंडर रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर रजतदेखील पारंपरिक अंदाजात दिसून आला.

बिग बॉस १४ ची विजेती रुबिना दिलैक सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. अनेकदा ती तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असते. सध्या रुबिना तिच्या धाकट्या बहिणीमुळे चर्चेत आली आहे.

रुबिनाची धाकटी बहीण ज्योतिका दिलैक हिच्याविषयी अनेकांना माहित असेल. रुबिना बिग बॉसच्या घरात असताना ज्योतिका या शोमध्ये आली होती.

ज्योतिका केवळ रुबिनाची धाकटी बहीण नसून प्रसिद्ध युट्यूबरदेखील आहे. त्यामुळे रुबिनाप्रमाणेच तिचा वेगळा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे अलिकडेच ज्योतिकाचा साखरपुडा झाला आहे.

ज्योतिकाचा प्रियकर रजत शर्मा याच्यासोबत साखरपुडा झाला असून या सोहळ्याचे काही फोटो ज्योतिका आणि रजतने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

"जवळपास ९ वर्षांपूर्वी आपण एकमेकांना भेटलो होतो. आणि, आज आपण कुठपर्यंत पोहोचलो आहोत. आकाशाकडे पाहिलं की असं वाटतंय संपूर्ण आकाश प्रेमाच्या रंगाने भरुन आलंय", असं कॅप्शन ज्योतिकाने शेअर केलेल्या फोटोला दिलं आहे.

मागील ९ वर्षांपासून ज्योतिका आणि रजत एकमेकांना डेट करत आहेत.

ज्योतिका प्रसिद्ध युट्यूबर असून ती कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

Read in English