अत्यंत हलाखीची परिस्थिती, पत्र्याचं घर अन् गंभीर आजाराचा सामना; जालन्याचा काळू डॉन म्हणाला- "दर महिन्याला रक्त बदलावं लागतं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 12:42 IST2026-01-14T12:07:09+5:302026-01-14T12:42:55+5:30
'बिग बॉस मराठी'च्या घरात आलेला काळू डॉन म्हणजेच प्रभू शेळके नक्की आहे तरी कोण? चला जाणून घेऊया.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी ६ हे पर्व सुरू होऊन आता दोन दिवस झाले आहेत.

पहिल्या दिवासापासूनच काळू डॉन म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रभू शेळकेने बिग बॉस मराठीचं घर गाजवण्यास सुरुवात केली आहे.

पण, 'बिग बॉस मराठी'च्या घरात आलेला काळू डॉन म्हणजेच प्रभू शेळके नक्की आहे तरी कोण? चला जाणून घेऊया.

प्रभू शेळके हा 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सगळ्यात तरुण स्पर्धक असल्याचं बोललं जात आहे. प्रभू हा लोकप्रिय रीलस्टार आहे. त्याचे अनेक रील सोशल मीडियावर व्हायरल होतात.

प्रभूला थेलेसेमिया नावाचा गंभीर आजार आहे. गेल्या ८ वर्षांपासून तो या आजाराचा गंभीर सामना करत आहे.

'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रभूने त्याच्या या आजाराबद्दल सांगताना दर महिन्याला शरीरातील रक्त बदलावं लागत असल्याचा खुलासा केला.

प्रभूचे इन्स्टाग्रामवर २.३ मिलियन फॉलोवर्स आहेत. त्याचे रील्स प्रचंड व्हायरल होतात.

'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रभूने एन्ट्री घेतल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. पण, त्याला चाहत्यांचा फूल सपोर्ट मिळत आहे.

















