सैफच्या 'या' गोष्टीमुळे अमृता सिंगला नको होतं मूल; मुलाखतीत स्वत: केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 15:25 IST2021-11-21T15:15:32+5:302021-11-21T15:25:54+5:30
Amrita singh: लग्नानंतर चार वर्ष अमृता मूल होण्यास टाळाटाळ करत होती.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा घटस्फोट होऊन आज कित्येक वर्ष लोटली आहेत. मात्र, तरीदेखील नेटकऱ्यांमध्ये ही जोडी कायम चर्चेत असते.
१९९१ मध्ये लव्ह मॅरेज करणाऱ्या या जोडीने जवळपास १३ वर्ष संसार केल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या जोडीच्या घटस्फोटोमागे अनेक कारणे असल्याचं सांगण्यात येतं.
सैफ आणि अमृताने ज्यावेळी घटस्फोटाचा निर्णय घेतला त्यावेळी सारा अली खान १० तर इब्राहिम ४ वर्षांचा होता.
सैफ-अमृताची लेक सारा अली खान कलाविश्वात सक्रीय असून अनेकदा ती आपल्या आई-वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. यात खासकरुन तिचे आई अमृतासोबतचे फोटो जास्त असतात.
आज अमृता जरी आपल्या मुलांसोबत एकत्र राहत असली तरीदेखील एकेकाळी तिला मूल नको होतं, हे तुम्हाला माहित आहे का? अनेकांना ही गोष्ट ठावूक नसेल. मात्र, एका मुलाखतीत अमृताने स्वत: याविषयी खुलासा केला.
लग्नानंतर चार वर्ष अमृता मूल होण्यास टाळाटाळ करत होती. मात्र, त्यामागे सैफ कारणीभूत असल्याचं तिने सांगितलं. सैफसाठीच तिने मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला होता.
सैफ आणि अमृताने ज्यावेळी लग्न केलं. त्यावेळी सैफ बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत होता. या स्ट्रगलिंगच्या काळात त्याच्यावर मुलांची, घराची जबाबदारी पडू नये यासाठी अमृताने मूल न होण्याचा निर्णय घेतला होता.
"सैफच्या करिअरसाठी मला मुलं होऊ द्यायची नव्हती. तो त्या काळी स्ट्रगल करत होता. त्यामुळे अशात त्याच्यावर मुलांची जबाबदारी मला टाकायची नव्हती", असं अमृता म्हणाली.