Avneet Kaur Birthday : नाम तो सुना होगा...! 21 वर्षाची अवनीत कौर आहे कोट्यवधीची मालकीण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 18:06 IST2022-10-13T18:00:05+5:302022-10-13T18:06:52+5:30
Avneet Kaur Birthday : 2010 साली ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’मध्ये स्पर्धक बनून आलेल्या अवनीतने आत्तापर्यंत 7 टीव्ही मालिकांत काम केलं आहे. 6 सिनेमांत झळकली आहे. लवकरच ती एका चित्रपटात लीड रोलमध्ये दिसणार आहे.

ज्या वयात अनेक लोक डिग्री मिळवण्यात बिझी असतात, त्या वयात अवनीत कौर नावाची ही मुलगी कुठल्या कुठे पोहोचली आहे. टीव्हीच्या दुनियेत नाव कमावणारी अवनीत 21 व्या वर्षी कोट्यवधी रूपयांची मालकीण आहे.
2010 साली ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’मध्ये स्पर्धक बनून आलेल्या अवनीतने आत्तापर्यंत 7 टीव्ही मालिकांत काम केलं आहे. 6 सिनेमांत झळकली आहे. लवकरच ती एका चित्रपटात लीड रोलमध्ये दिसणार आहे.
आज अवनीतचा वाढदिवस. 13 ऑक्टोबर 2001 रोजी जन्मलेली अवनीत 21 वर्षांची झाली आहे.वयाच्या 8 व्या वर्षीपासून अवनीत डान्स परफॉर्मन्स देऊ लागली आणि बघता बघता टीव्हीची स्टार बनली.
अॅक्टिंग करिअरसोबतच अवनीतचं शिक्षणही सुरू आहे. मुंबईच्या एका प्रायव्हेट कॉलेजमधून ती कॉमर्सची डिग्री घेतेय.
अवनीतने डान्स इंडिया डान्स- लिटील मास्टर या शोमधून करिअरला सुरूवात केली होती. सेमिफायनलआधीच ती या शोमधून बाद झाली होती.
यानंतर डान्स के सुपरस्टार्स या रिअॅलिटी शोमध्येही तिने भाग घेतला. पुढे ती अॅक्टिंगमध्ये आली. मेरी मां, टेढे है पर मेरे है, सावित्री, एक मुठ्ठी आसमान या मालिकेत तिने काम केले.
‘अलादीन- नाम तो सुना होगा’ या मालिकेत तिने यासमीनची भूमिका साकारत होती. टीव्ही व्यतिरिक्त बॉलिवूडच्या करीब करीब सिंगल, मर्दानी चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातही ती झळकली होती.
लवकरच अवनीत कौर नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत ‘टीकू वेड्स शेरू’ या चित्रपटात दिसणार आहे. अवनीत सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे रोज नवे फोटो ती शेअर करत असते.
एका रिपोर्टनुसार,अवनीतची नेटवर्थ सुमारे 7 कोटी रूपये आहे. होय, वयाच्या 21 व्या वर्षी ती करोडो रूपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियावरच्या प्रमोशनल पोस्टमधून ती बक्कळ कमाई करते.
टीव्ही, चित्रपट, म्युझिक व्हिडीओ, जाहिरातीतून अवनीत दरवर्षी सुमारे 1 कोटी कमावते. याशिवाय ब्रँड एंडोर्समेंट आणि प्रमोशनल सोशल मीडिया पोस्टमधून दर महिन्याला सुमारे 8 लाखांची कमाई करते.
मुंबईत तिने स्वत:चं घर खरेदी केलं आहे. या घरात ती तिच्या आईवडिलांसोबत राहते. 80 लाखांच्या रेंज रोव्हरमधून फिरणाऱ्या अवनीतकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत. तिला महागड्या हँडबॅग्सची आवड आहे.