'अग्गंबाई सासूबाई'फेम मॅडीचा नवरादेखील आहे अभिनेता; 'माझा होशील ना'मध्ये साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 11:22 IST2022-02-02T11:18:53+5:302022-02-02T11:22:37+5:30
Bhakti ratnaparkhi: भक्ती कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असते.यात अनेकदा ती तिच्या कुटुंबासोबतचे फोटोही शेअर करत असते. त्यामुळेच आज भक्तीचा नवरा नेमकं काय करतो हे जाणून घेऊयात.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे अग्गंबाई सासूबाई. या मालिकेत निवेदिता सराफ यांची मुख्य भूमिका होती.
या मालिकेतील निवेदिता सराफ यांच्या व्यतिरिक्त शुभ्रा, अभिजीत राजे, सोहम आणि मॅडी या भूमिकादेखील चांगल्याच गाजल्या.
'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत अभिनेत्री भक्ती रत्नपारखी हिने मॅडी ही भूमिका साकारली होती.
आपल्या विनोदी अभिनयशैलीमुळे भक्तीने या मालिकेच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकाचं मन जिंकून घेतलं.
भक्ती कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असते.यात अनेकदा ती तिच्या कुटुंबासोबतचे फोटोही शेअर करत असते. त्यामुळेच आज भक्तीचा नवरा नेमकं काय करतो हे जाणून घेऊयात.
भक्तीप्रमाणेच तिचा नवरादेखील कलाविश्वात सक्रीय आहे.
भक्तीच्या नवऱ्याचं नाव निखिल रत्नपारखी असून तो मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे.
निखिलने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांत विनोदी भूमिका साकारल्या आहेत.
‘ओह माय गॉड’, ‘पहेली’, ‘जयंताभाई कि लव्हस्टोरी’ यासारख्या हिंदी चित्रपटांतही त्याने काम केलं आहे. तसंच ‘नारबाची वाडी’, ‘व्हेंटिलेटर’, ‘सुपरस्टार’ यासारख्या मराठी चित्रपटांमध्येही तो झळकला आहे.
तसंच अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या माझा होशील ना या मालिकेतही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेत त्याने पिंट्या मामा ही भूमिका वठवली होती.