कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानची चाहत्यांसाठी गुडन्यूज, बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 18:40 IST2025-06-04T18:27:38+5:302025-06-04T18:40:44+5:30
Hina Khan Rocky Jaiswal Wedding Pics: कॅन्सरशी झुंज देणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीने घेतलेल्या निर्णयाचं सर्वांनी कौतुक करुन अभिनंदन केलंय

हिना खानने नुकतीच तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. लाँग टाईम बॉयफ्रेंडसोबत हिना खानने लग्न केलंय.
सोशल मीडियाच्या माध्यमातून हिनाने तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी लग्न केल्याची गुड न्यूज सर्वांना दिली आहे. हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे
हिना खानने लग्नाचा हा निर्णय घेतल्याने तिच्या सर्व चाहत्यांनी अभिनंदन केलं आहे. हिना खानने लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
हिना खान कॅन्सरचं निदान झाल्यावर निराश न होता आयुष्याचे सकारात्मक क्षण सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. त्यामुळे हिनाने लग्नाचे फोटो पोस्ट करताच तिच्या सर्व चाहत्यांना आनंद झाला आहे
हिना खानने लग्नात पांढरी साडी परिधान केली असून तिचा बॉयफ्रेंड रॉकीने पांढरा कुर्ता परिधान केला आहे. हिनाने लग्नात पारंपरिक पोशाख परिधान करुन सर्वांचं लक्ष वेधलंय
हिना खानने अत्यंत साधेपणाने आणि जवळच्या मित्र-मैत्रीणींच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केलं आहे. कोणताही दिखावा किंवा गाजावाजा न करता हिनाने लग्न केलंय
हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत असून ती उपचार घेत असते. दरम्यान बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याने हिनाने तिच्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली, असं म्हणता येईल