पत्नीला ४ वेळा कॅन्सर झाला, घरही विकावं लागलं! लोकप्रिय अभिनेत्याची संघर्षाची कहाणी वाचून डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:16 IST2026-02-20T16:08:18+5:302026-02-20T16:16:28+5:30

आपण सिनेसृष्टीत अनेक कलाकारांच्या घटस्फोटाच्या बातम्या ऐकतो. कठीण काळात एकमेकांची साथ न देता हे कलाकार एकमेकांपासून वेगळे होतात. पण असा एक अभिनेता आहे ज्याने पत्नीला ४ वेळा कॅन्सर झाला असूनही तिची साथ न सोडता तिच्यामागे खंबीरपणे उभा राहिला.

आपण सिनेसृष्टीत अनेक कलाकारांच्या घटस्फोटाच्या बातम्या ऐकतो. कठीण काळात एकमेकांची साथ न देता हे कलाकार एकमेकांपासून वेगळे होतात. पण असा एक अभिनेता आहे ज्याने पत्नीला ४ वेळा कॅन्सर झाला असूनही तिची साथ न सोडता तिच्यामागे खंबीरपणे उभा राहिला.

हा अभिनेता म्हणजे शरीब हाश्मी. द फॅमिली मॅन या वेबसीरिजच्या माध्यमातून शरीब हाश्मी जे के तळपदे या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. शरीबची संघर्षाची कहाणी वाचून तुमचेही डोळे पाणावतील.

शरीब हाश्मी अनेकदा मुलाखतींमध्ये आपल्या पत्नीचा उल्लेख 'रिअल हिरो' असा करतो. "माझ्या पत्नीने जो संघर्ष केला आहे, त्यासमोर माझा संघर्ष काहीच नाही," असे तो अत्यंत अभिमानाने सांगतो.

१९९८ मध्ये शरीबची नसरीन यांना पहिल्यांदा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून आजवर त्यांनी चार वेळा या आजाराचा सामना केला आहे. प्रत्येक वेळी खचून न जाता त्यांनी अत्यंत धैर्याने हा लढा दिला आणि त्यात त्या विजयी ठरल्या. या काळात शरीब पत्नीच्या मागे खंबीरपणे उभा होता.

शरीब आणि नसरीन यांचे लग्न २००३ मध्ये झाले होते. तेव्हापासून ही जोडी प्रत्येक संकटात एकमेकांच्या सोबतीने उभी आहे.

सुरुवातीच्या काळात शरीबकडे इंडस्ट्रीत इतकं काम नव्हतं. तीन वर्ष कामाची कमतरता असल्याने शरीबला राहातं घर विकावं लागलं.

याही काळात शरीबला आणि बायकोने एकमेकांवर विश्वास ठेवला आणि साथ दिली. आज शरीब एक यशस्वी अभिनेता म्हणून सिनेसृष्टीत चर्चेत आहे