मराठी मुलीसोबत 22 वर्षांपासून लिव्ह इन मध्ये राहतोय 'हा' हिंदी अभिनेता, लग्न करणारच नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 12:44 IST2025-01-10T12:36:01+5:302025-01-10T12:44:43+5:30
"मी तिला ओशो आश्रमात घेऊन गेलो अन्...", रिलेशनशिपबाबत आणि लग्नाच्या विचाराबद्दल अभिनेता काय म्हणाला वाचा

अनेक हिंदी मालिकांमध्ये आपण या अभिनेत्याला बघितलंच असेल. हा आहे अभिनेता संदीप बसवाना(Sandeep Baswana). अनेकदा तो वडिलांच्या भूमिकेत दिसला आहे.
२००२ मध्ये 'कुछ झुकी पलके' आणि 'कुसूम' मालिकेपासून त्याने करिअरला सुरुवात केली. 'क्योकी सांस भी कभी बहु थी', 'कसौटी जिंदगी की' ते आता 'दिल दिया गल्लाँ' या गाजलेल्या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारली.
४७ वर्षीय संदीप बसवाना तब्बल २२ वर्षांपासून एका अभिनेत्रीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. तिचं नाव आहे अश्लेषा सावंत(Ashelesha Savant). ती देखील अभिनेत्रीच आहे.
अश्लेषा सावंतने 'कुमकूम भाग्य','प्यार का दर्द है','सात फेरे' ते अलीकडेच 'अनुपमा' या गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे. ४० वर्षीय अश्लेषा मूळची पुण्याची आहे.
'कमल' या मालिकेच्या सेटवर अश्लेषा आणि संदीप एकमेकांना भेटले. तेव्हा अश्लेषा १८ वर्षांची होती तर संदीप २४ वर्षांचा. नुकतंच ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत संदीप बसवाना म्हणाला, "आम्ही भेटलो तेव्हा असं काहीही ठरवलं नव्हतं की आयुष्यात असं असं करायचं आहे. अश्लेषा तेव्हा मला म्हणायची की तू लीड कर मी तुझ्यामागे उभी आहे."
"सुरुवातीला अश्लेषाला मेडिटेशनमध्ये फारसा रस नव्हता. मी तिला ओशोच्या आश्रमात घेऊन गेलो. तेव्हा आमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. उद्या आम्ही वेगळे झालो तरी काही हरकत नाही एवढी मनाची शांती मिळायला हवी."
लग्नाविषयी अभिनेता म्हणाला, "कुटुंबाला आणचं लग्न लावायचं आहे. पण आमचा मुद्दा वेगळा आहे. मंगळसूत्र घातल्याने किंवा थाटामाटात लग्न केल्याने आम्ही आनंदी होऊ असं नाही. हा कदाचित आईवडिलांसाठी आम्ही भविष्यात लग्न करु. पण लग्न हे आमचं ध्येय नाही तर आनंदी राहणं आणि शांतता मिळणं हे आहे."
मी वर्तमानात जगतो. आम्ही आताच लग्न करणार नाही. पण लग्न करो वा ना करो मी तिच्यासोबत कायम असेल. आपल्याकडे पेपरवर्कला फार महत्व आहे. ही माझी पत्नी आहे हे लोकांना सांगण्यासाठी मला लग्न करायचं नाही."