शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा, Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरी करा भीम जयंती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 20:49 IST

1 / 8
आजचा दिवस आहे गौरवाचा, उगवला एक तेजस्वी सूर्य समाजहितासाठी लढणारा, ज्याने दिला संविधानाचा अनमोल वारसा, देशाला दिला नव्या भविष्याचा आधार... डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
2 / 8
बाबांच्या लेखणीने लिहिलं भविष्य आमचं, दिशा दिली अन्यायाविरोधात चालण्याची, वेळ बदलेल, काळही बदलेल पण जय भीमचा नारा कायम गगनात घुमेल... डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
3 / 8
मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची तू जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची... भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
4 / 8
नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवतेला, नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या बाबासाहेबांना! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
5 / 8
सजली अवघी धरती पाहण्या तुमची कीर्ती, तुम्ही येणार म्हटल्यानं नसानसात भरली स्फूर्ती, आतुरता फक्त आगमनाची जयंती माझ्या बाबांची! भीम जयंतीच्या शुभेच्छा!
6 / 8
सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही, अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही… डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
7 / 8
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
8 / 8
निळ्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे, घाबरू नको कुणाच्या बापाला तू भीमाचा वाघ आहेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरWishes in Marathiमराठी शुभेच्छाIndian Festivalsभारतीय उत्सव-सण