उन्हाळ्यामध्ये स्ट्राइप ड्रेसेस ट्राय करून दिसा कूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 18:06 IST2019-06-01T18:01:23+5:302019-06-01T18:06:25+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये जर कोणता फॅशन ट्रेन्ड असेल तर तो स्ट्राइप्सचा ट्रेन्ड. स्ट्राइप्स प्रत्येक प्रकारच्या कलर कॉम्बिनेशनमध्ये सुंदर दिसतात. तसेच हे दिसायला फार सुंदर दिसतात. मग तो शर्ट असो किंवा फ्रॉक, गाउन असो किंवा साडी कोणत्याही प्रकारच्या ड्रेसवर तुम्ही स्ट्राइप्ससोबत एक्सपरिमेंट करू शकता. या बॉलिवूड सेलिब्रिटींना पाहून तुम्हीही स्ट्राइप्स कलेक्शन ट्राय करण्यापासून स्वतःला थांबवू शकणार नाही.
आलिया भट्ट
रात्री आउटिंगला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आलिया भट्टचा हा स्ट्राइप मिडी ड्रेस ट्राय करू शकता.
दीपिका पादुकोण
कान्समध्ये दीपिका या स्ट्राइप्ड पॅन्ट सूटमध्ये दिसून आली होती. तुम्हीही दीपिकाचा लूक कॉपी करू शकता.
स्ट्राइप्ड साडी
फक्त वेस्ट्रन ड्रेसेजवर नाही तर साडीवरही स्ट्राइप सुंदर दिसतात. शिल्पा शेट्टीप्रमाणे स्ट्राइप्ड साडीमध्ये तुम्हालाही हटके लूक मिळेल.
ऐश्वर्याचा स्ट्राइप्ड लूक
ऐश्वर्या राय बच्चनदेखील कान्समध्ये या स्ट्राइप्ड फ्रॉक ड्रेसमध्ये दिसून आली. उन्हाळ्यमध्ये आउटिंगसाठी जाण्याचा विचार करत असाल तर ऐश्वर्याचा लूक ट्राय करू शकता.
बोल्ड लूकसाठी ट्राय करा करिनाचे क्लासी लूक
करिनाप्रमाणे हा लूक ट्राय करा तुम्हाला बोल्ड दिसण्यासोबतच एलिगंट लूकही मिळेल.