मुंबईतील 'या' ठिकाणी स्वस्त आणि मस्त शॉपिंगचा आनंद लुटा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 03:35 PM2018-10-19T15:35:40+5:302018-10-19T16:38:39+5:30

शॉपिंग हा महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. शॉपिंगसाठी कोणत्याही सण-समारंभाची वाट पाहण्याची गरज नसते. एखादं लहान कारण ही शॉपिंगसाठी पुरेस असतं. मुंबईत अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्ही स्वस्त आणि मस्त शॉपिंग करू शकता. अशाच काही मुंबईतल्या प्रसिद्ध ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.

शॉपिंगसाठी मुंबईतील कुलाबा कॉझवे ही जागा अत्यंत प्रसिद्ध आहे. येथे हातमागावर तयार करण्यात आलेल्या गोष्टी, पुस्तकं, कपडे, शूज, ज्वेलरी आणि बरच काही अशा युनिक गोष्टी अगदी परवडणाऱ्या किंमतीत मिळतात.

फॅशन स्ट्रिट ही जागा सीएसएमटी रेल्वे स्टेशनजवळ जागा आहे. या ठिकाणी ट्रेंडी आणि सर्वात लेटेस्ट फॅशन उपलब्ध होते. त्यामुळे मुंबईकर या ठिकाणी हमखास शॉपिंग करतात. फॅशन स्ट्रिटवर 150 हून अधिक स्टॉल्स असून स्वस्त दरात हवी तेवढी शॉपिंग करता येते.

वांद्रे येथील लिंकिंग रोड हे अनेक मुलीच्या आवडीचं ठिकाणं. या ठिकाणी किंमत कमी करता येत असल्याने अनेक जण शॉपिंगसाठी याच जागेला पसंती देतात. येथे वेस्टर्न फूट वेअर, क्लोथ आणि अॅक्सेसरिज उपलब्ध आहेत.

वांद्रे रेल्वे स्टेशन जवळी हिल रोड ही शॉपिंगसाठीचं लोकप्रिय ठिकाण आहे. या ठिकाणी कपडे, शूज, ज्वेलरी, बॅग या सर्वच गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध होतात.

चोर बाजार हे मुंबईतील अत्यंत गजबजलेलं ठिकाण. या ठिकाणी अनेक हटके गोष्टी स्वस्त दरात मिळत असल्याने ग्राहकांची गर्दी असते.

क्रॉफर्ड मार्केट हे मुंबईतील आणखी एक शॉपिंगसाठीचं लोकप्रिय ठिकाण आहे. या ठिकाणी होलसेलमध्ये फळ, भाज्या आणि मसाले मिळतात. तसेच तुम्हाला जर पाळीव प्राण्यांची किंवा पक्ष्यांची आवड असेल तर ते ही येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत.

अंधेरी जवळील लोखंडवाला मार्केट हे खास चप्पल आणि कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. कपड्यांचं तसेच अनेक गोष्टींचं उत्तम कलेक्शन याठिकाणी उपलब्ध आहे.

कपडे खरेदीसाठी दादरमधील हिंदमाता मार्केट हा उत्तम पर्याय आहे. या मार्केटमध्ये कपड्याची असंख्य दुकानं वसलेली आहेत. या मार्केटमध्ये ड्रेस आणि साड्यांचं चांगलं कलेक्शन पाहायाला मिळतं.

दागिन्यांची खरेदी करण्यासाठी मुंबईतील झवेरी बाजार हे अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे. ‘ज्वेलरी मार्केट’ वरून या ठिकाणाला झवेरी बाजार हे नाव पडले. या ठिकाणी अत्यंत सुंदर आणि वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने मिळतात. दागिन्यांची आवड असल्यास या ठिकाणाला एकदा तरी नक्की भेट द्या.

टॅग्स :मुंबईMumbai