Godwit : पक्षी पाहुणे आले! युरोपियन फॅशनमधला 'गॉडवीट' आला भारताच्या सफरीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 11:02 AM2022-04-05T11:02:21+5:302022-04-05T11:18:33+5:30

Godwit : भारतामध्ये साधारणपणे थंडी पासून ते उन्हाळ्यापर्यंत हा पक्षी आढळतो. याला मराठीत पाणटीवळा असे म्हणतात.

गॉडवीट नावाचा हा स्थलांतरित पक्षी असून हा मूळचा युरोपियन फॅशन मधला पक्षी आहे. खाद्याच्या शोधात आणि थंडीपासून बचाव करण्याकरता हा पक्षी स्थलांतर करतो.

भारतामध्ये साधारणपणे थंडी पासून ते उन्हाळ्यापर्यंत हा पक्षी आढळतो. याला मराठीत पाणटीवळा असे म्हणतात.

साधारणपणे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये या पक्षाला प्रजनन पिसारा म्हणजे ब्रीडिंग पलमेज येते.

रंग रुपाची ही झळाळी फक्त नराच्या अंगावर येते. त्याचं रुपडं पालटतं आणि या आकर्षक रूपामुळे तो माद्यांना आपल्याकडे आकर्षित करतो.

त्यातून पुढे त्यांचा वंश वाढतो. आता हे पक्षी आपणास ऐरोली, ठाणे, वसई, शिवडी परिसरात पाहण्यास मिळत आहेत. अशी माहिती पक्षी अभ्यासक दिवाकर ठोंबरे यांनी दिली.