डॉक्टरने न सांगता केला स्वत:च्या स्पर्मचा वापर, ४० वर्षांनी महिलेकडून नुकसान भरपाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 12:27 PM2021-06-02T12:27:49+5:302021-06-02T12:41:04+5:30

कोर्टात दिलेल्या कागदपत्रात वॉस म्हणाली की, तिने डॉक्टरला एक अज्ञात स्पर्म डोनर उपलब्ध करून देण्यास सांगितलं होतं. ग्रीनबर्गने वॉसकडून यासाठी १०० डॉलर म्हणजे ७,३२५ रूपये घेतले होते.

न्यूयॉर्कमध्ये मेडिकल रेपची एक अजब घटना समोर आली आहे. एका महिलेने ४० वर्षानंतर आपल्या डॉक्टरवर हा गंभीर आरोप लावला आहे. महिलेने सांगितलं की, तिला प्रेग्नेन्सीमध्ये समस्या होत होती. ज्यामुळे ती एका स्पर्म डोनरच्या शोधात डॉक्टर मार्टिन ग्रीनबर्गला भेटली होती.

बियांका वॉस नावाच्या या महिलेने डॉक्टर मार्टिन ग्रीनबर्गविरोधात कोर्टात तक्रार केली आहे. कोर्टात देण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, वॉसने लिहिले की, १९८३ मध्ये फर्टिलिटी सर्व्हिस संदर्भात ती डॉक्टर ग्रीनबर्गला भेटली होती. वॉसनुसार, डॉक्टरने तिची परवानगी न घेता आपल्या स्पर्मने तिची गर्भधारणा केली. ते तिला आता ४० वर्षांनी समजलं.

तक्रारीत लिहिलं आहे की, 'काही लोक या कृत्याला मेडिकल रेप म्हणतात. ग्रीनबर्गकडून करण्यात आलेलं हे कृत्य अनैतिक, अस्वीकार्य आणि अवैध आहे'. वॉसला याबाबतचा खुलासा ४० वर्षांनी झाला. वॉसने सांगितलं की, ग्रीनबर्गच्या या कारनाम्याची माहिती तिला तेव्हा मिळाली जेव्हा तिला तिची मुललगी रोबर्टोची DNA प्रोफाइल मिळाली. यात रॉबर्टोच्या वडिलांचं नाव डॉक्टर ग्रीनबर्ग असं होतं

कोर्टात दिलेल्या कागदपत्रात वॉस म्हणाली की, तिने डॉक्टरला एक अज्ञात स्पर्म डोनर उपलब्ध करून देण्यास सांगितलं होतं. ग्रीनबर्गने वॉसकडून यासाठी १०० डॉलर म्हणजे ७,३२५ रूपये घेतले होते. तसेच त्याने विचारले होते की, स्पर्म डोनरच्या जाती किंवा धर्माबाबत काही प्राथमिकता आहे का?

वॉसने अमेरिकेतील एनबीसी न्यूजला सांगितले की, 'मला एक अज्ञात डोनर हवा होता. ग्रीनबर्गने मला विचारले होते की, डोनर ख्रिश्चन असेल तर चालेल का? मी म्हणाले होते की, मला काहीच अडचण नाही. मला वाटलं कदाचित स्पर्म डोनर त्याच्या हॉस्पिटलमधील कुणी मेडिकल स्टुडंट असेल. पण सत्य काही वेगळंच होतं. त्यानंतर मी त्याला डोनरला देण्यासाठी १०० डॉलरचा चेकही दिला'.

तक्रारीनुसार, ग्रीनबर्गने आपलेच स्पर्म वापरले ज्यानंतर १९८४ मध्ये वॉसने एका मुलीला जन्म दिला. वॉसने सांगितले की, 'त्याने मला हे सांगितलं नव्हतं की, तो त्याचेच स्पर्म वापरणार आहे. तो म्हणाला होता की डोनर एक अज्ञात व्यक्ती असेल. त्याने असाही विश्वास दिला होता की, डॉक्टर स्वत: स्पर्म डोनेट करू शकत नाही'. सध्यावर ग्रीनबर्गकडून काहीच स्पष्टीकरण आलेलं नाही.

मुलगी रॉबर्टाने आपल्या परिवाराच्या इतिहासाबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तिला तिच्या बायोलॉजिकल वडिलांची माहिती मिळाली. तक्रारीत म्हटलं आहे की मेडिकल हिस्ट्री जाणून घेण्यासाठी रोबर्टाने ग्रीनबर्गला अनेक संपर्क केला. पण काहीच उत्तर मिळालं नाही.

कोर्टात देण्यात आलेल्या याचिकेत म्हटलं आहे की,, ग्रीनबर्गमुळे वॉसला गंभीर चिंतेचा सामना करावा लागत आहे. भावनात्मक वेदना आणि तिचा विश्वास उडाला आहे. आपल्या तक्रारीत वॉसने ग्रीनबर्गकडून ७५ हजार डॉलरची म्हणजे ५४,९७,८०० रूपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.

रोबर्टाने एनबीसी न्यूजला सांगितले की, 'जेव्हाही मी आरसा बघते तेव्हा मला त्या व्यक्तीचा चेहरा दिसतो ज्याने माझ्या आईचा विश्वास तोडला आहे. मला आतल्या आत एक अवस्थता जाणवतो. अखेर मी कोण आहे? या सर्वांचा अर्थ काय आहे आणि एक व्यक्ती असं कसं वागू शकते? मला याचा त्रास होतो आहे'.

याआधीही अशाप्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. अनेक डॉक्टरांनी आपल्याच स्पर्मचा वापर केला. Ancestry.com नुसार, १९८० मध्ये एका डीएनए टेस्टमधून समजलं होतं की, डॉक्टरने आपले स्पर्म देऊन महिलेला गर्भवती केलं. २०१९ मध्ये कॅनडात डॉक्टरने साधारण ५० ते १०० महिलांना आपले स्पर्म दिले होते. त्यानंतर डॉक्टरचं लायसन्स कॅन्सल झालं होतं.