काँग्रेस आमदाराला अज्ञात महिलेकडून व्हिडिओ कॉल, अश्लील कृत्य करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 07:11 PM2021-05-26T19:11:52+5:302021-05-26T19:32:14+5:30

congress mla blackmail obscene acts chhatarpur : अज्ञात महिलेच्या ब्लकमेलिंगनंतर या आमदाराने पोलिसाकडे मदतीसाठी पोलिसांत धाव घेतली आहे.

छतरपूर : मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या एका आमदाराला (MLA) अज्ञात महिलेने अश्लील व्हिडीओ कॉल (Obscene video Call) करून ब्लॅकमेल (Blackmail) केल्याची घटना समोर आली आहे.

अज्ञात महिलेच्या ब्लकमेलिंगनंतर या आमदाराने पोलिसाकडे मदतीसाठी पोलिसांत धाव घेतली आहे. या प्रकरणी गढीमलहरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या काँग्रेस आमदाराचे नाव नीरज दीक्षित असून ते मध्य प्रदेशातील महाराजपूर मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मागील काही दिवसांपासून त्याच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून मेसेज येते होते.

मतदार संघातील एखाद्या गरजू व्यक्तीचा मेसेज असल्याचे समजून त्यांनी याला रिप्लाय दिला. पण यानंतर संबंधित मोबाइल नंबरवरून व्हिडीओ कॉल येणे सुरू झाले. एकेदिवशी संबंधित महिलेने व्हिडीओ कॉल करून अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. त्यानंतर संबंधित अज्ञात महिलेनं ब्लॅकमेल करायलाही सुरुवात केली, असे आमदार नीरज दिक्षित यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

आमदार नीरज दीक्षित यांनी २१ मे रोजी गढीमलहरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून महिलेचा शोध घेतला जात आहे.

संबंधित महिला नेमकी कोण आहे? आणि ती आमदाराला का त्रास देत आहे? या बाबी पोलीस तपासानंतरच स्पष्ट होतील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

याप्रकरणी डीएसपी शशांक जैन यांनी सांगितले की, ही सायबर गुन्ह्यांची एक नवीन पद्धत आहे. बर्‍याच वेळा अश्लील कृत्ये करताना महिला संबंधित कॉल रेकॉर्ड करतात आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीला ब्लॅकमेल केले जाते.

याच वस्तुस्थितीच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. ब्लॅकमेल करणार्‍या महिलेचा लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. दरम्यान, या महिलेवर कारवाई करण्याची मागणी आमदार नीरज दीक्षित यांनी केली आहे.