२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 06:22 AM2024-05-16T06:22:42+5:302024-05-16T06:22:59+5:30
आंबेडकर म्हणाले की, कोणत्यातरी धार्मिक संघटनेला वाचवण्यासाठी, व्यक्तीला वाचवण्यासाठी त्या काळी आपल्यावर दबाव असेल तर तो आता बिनधास्त सांगा.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ॲड. उज्ज्वल निकम यांनी प्रामाणिकपणे सांगावे त्यांच्यावर २६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? करकरे, साळसकर, कामटे आणि पाच पोलिस कर्मचाऱ्यांसंदर्भातले पुरावे लीड करू नका, अशा कोणी सूचना दिल्या होत्या का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे बुधवारी केला.
मुंबईत वंचितच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ॲड. आंबेडकर म्हणाले की, निकम आपण लोकसभेचे उमेदवार आहात. आता कोणताही दबाव नाही. कोणत्यातरी धार्मिक संघटनेला वाचवण्यासाठी, व्यक्तीला वाचवण्यासाठी त्या काळी आपल्यावर दबाव असेल तर तो आता बिनधास्त सांगा.