शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राज्यस्तरीय बॉक्सरची चाकू भोसकून हत्या; अल्पवयीन मुलीची छेडछाड रोखणं बेतलं जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 3:15 PM

1 / 9
लेखी तक्रार देण्याऐवजी त्या महिलेने आरोपींना समज देण्याची विनंती केली. यानंतर सोमवारी रात्री उशिरा दोन गटांमध्ये हाणामारी झाली आणि त्यात २६ वर्षीय कामेश उर्फ रौनकला जीव गमवावा लागला. कामेश उर्फ रौनक हा एमबीएचा दुसरा वर्षाचा विद्यार्थी होता. त्याने पंजाब आणि दिल्लीमध्ये मॉडेलिंगही केले होते. याशिवाय तो बॉक्सिंगचा चांगला खेळाडूही आहे. (Photo - Amarujala)
2 / 9
पोलिसांनी दोन्ही प्रकरणांचा तपास केला असता आरोपी एकच निघा. आरोपी राहुल उर्फ नाली याला अटक करण्यात आली. यानंतर पोलिसांसमोर हत्येचे कारण पुढे आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. कामेशच्या हत्येनंतर लोकांनी आरोपीच्या अटकेसाठी रस्ता रोखला. (Photo - Amarujala)
3 / 9
पाडा मोहल्ला येथील रहिवासी असलेला राजेश लोहट हा महापालिकेत स्टोअर कीपर आहे. सोमवारी रात्री त्याचा मुलगा कामेशचा खून झाला. कामेश हा दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. आपला मित्र विशाल आणि शिव यांच्या घरी जाण्याविषयी बोलल्यानंतर कामेश सोमवारी रात्री निघून गेला होता, अशी माहिती राजेशने पोलिसांना दिली. (Photo - Amarujala)
4 / 9
साडेदहाच्या सुमारास शिवाच्या घरी भांडणं झाली. या हाणामारीत राहुल उर्फ नली, सनी, रोहित आणि इतर दोन मुलांनी मारहाण केली. राहुलने चाकूने रौनकच्या छातीवर आणि पोटात वार केले. विशाल, शिवा आणि फारुल यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. जखमी कामेशला पीजीआय येथे नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. (Photo - Amarujala)
5 / 9
राजेश यांनी पोलिसांना सांगितले की, कामेशचे मित्र विशाल आणि फारुल यांना या भांडणाबद्दल विचारले असता त्यांनी सोमवारी दुपारी राहुलने एका अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याचे सांगितले. तेव्हा कामेश, विशाल आणि त्याच्या साथीदारांनी मुलीला मदत केली. आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. या वैरामुळेच हा गुन्हा घडला. (Photo - Amarujala)
6 / 9
त्याचवेळी पोलिसांचे म्हणणे आहे की, मुलीची आई पोलिसांकडे आली होती, परंतु आरोपी राहुलविरूद्ध लेखी तक्रार दिली नाही. ती म्हणाले की, आरोपीला बोलवून समज द्या. पोलिसांनी माहिती काढली तेव्हा आरोपी घरी नव्हता. रात्री उशिरा दोन गटांत हाणामारी झाली. यात एका युवकाने आपला जीव गमावला.
7 / 9
मृतक कामेशच्या नातेवाईकांनी मंगळवारी पोलिसांना 2 मिनिट 19 सेकंदांची व्हिडिओ क्लिप दिली. व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की, काही तरुण एका युवकाला मारहाण करत घरासमोर पोहोचले. एक मिनिट हाणामारी सुरु राहिली. त्यानंतर एक तरुण काठी घेऊन आला, पण कामेशने काठी काढून घेतली.
8 / 9
त्यानंतर दोन्ही गटांत हाणामारी झाली. पुढच्या ४५ सेकंदासाठी बुक्क्यांनी आणि काठ्यांनी हाणामारी सुरु होती. लोकांनी बघ्याची भूमिका घेत दोन गटांतील मुलांना वेगळे करण्याऐवजी पाहात राहिले. मग एक गट रस्त्याच्या गल्लीत गेला. एक तरुण परत आला, त्याने कामेशच्या छातीवर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. कामेशला त्याच्या साथीदारांनी पीजीआयमध्ये नेले, तिथेच त्याचा मृत्यू झाला.
9 / 9
सोमवारी आरोपी युवक राहुलने अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याचे पोलिसांना तपासात समजले आहे. तिची आई पोलिस चौकीकडे गेली होती, परंतु लेखी तक्रार दिली नाही. यानंतर आरोपीने संध्याकाळी कामेश आणि त्याच्या मित्रांशी भांडण केले. पोलिसांनी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी राहुल उर्फ नली याला अटक करण्यात आली आहे, तर त्याचा भाऊ सनी पीजीआयमध्ये दाखल आहे, तिथे पोलिस तैनात आहेत. डॉक्टरांची परवानगी मिळताच त्यालाही अटक केली जाईल असे डीसीपी गोरखपाल राणा यांनी सांगितले. 
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसHaryanaहरयाणाboxingबॉक्सिंग