Join us  

IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव

IPL 2024 CSK vs SRH Live Match: चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा दारूण पराभव केला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 11:27 PM

Open in App

IPL 2024 CSK vs SRH Live Match Updates In Marathi | चेन्नईऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सनेसनरायझर्स हैदराबादचा दारूण पराभव केला. हैदराबादला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. तुषार देशपांडेच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने ७८ धावांनी विजय मिळवत दोन गुण मिळवले. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील ४६ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने होते. (IPL 2024 News) मराठमोळ्या खेळाडूंनी चेन्नईसाठी किल्ला लढवला. कर्णधार ऋतुराज गायकवाडने ९८ धावांची अप्रतिम खेळी केली. तर २१३ या धावांचा बचाव करताना तुषार देशपांडेने सर्वाधिक ४ बळी घेतले. अखेर हैदराबादचा संघ निर्धारित २० षटके देखील खेळू शकला नाही आणि १८.५ षटकांत १३५ धावांवर सर्वबाद झाला. सर्वाधिक धावा करणाऱ्या ऋतुराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. 

तुषार देशपांडेने चेन्नईसाठी अप्रतिम कामगिरी करताना ३ षटकांत २७ धावा देत चार बळी घेतले, तर मथीक्क्षा पथिराना आणि मुस्तफिजुर रहमान यांना २-२ बळी घेता आले. याशिवाय रवींद्र जडेजा (१) आणि इम्पॅक्टच्या रूपात आलेल्या शार्दुल ठाकूरने (१) बळी घेऊन चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. चेन्नईने ७८ धावांनी मोठा विजय मिळवल्याने त्यांचा नेट रनरेटही चांगला वाढला. 

CSK चा मोठा विजय 

चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या हैदराबादच्या संघाकडून कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. एडन मार्करमने सर्वाधिक ३२ धावा केल्या, तर ट्रॅव्हिस हेड (१३), अभिषेक शर्मा (१५), अनमोलप्रीत सिंग (०), नितीश कुमार रेड्डी (१५), हेनरिक क्लासेन (२०), अब्दुल समद (१९), शाहबाज अहमद (७), पॅट कमिन्स (५), जयदेव उनाडकट (१) आणि भुवनेश्वर कुमार (४) धावा करून नाबाद परतला.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने स्फोटक खेळी केली, त्याचे थोडक्यात शतक हुकले. ऋतुराजने ९८ धावा करून हैदराबादसमोर २१३ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. ऋतुराजने ३ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने ५४ चेंडूत ९८ धावांची खेळी केली. त्याला डेरिल मिचेलने चांगली साथ देत ५२ धावा कुटल्या. अखेर चेन्नईने निर्धारित २० षटकांत ३ बाद २१२ धावा करून हैदराबादला विजयासाठी २१३ धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि जयदेव उनाडकट यांना प्रत्येकी १-१ बळी घेता आला.

चेन्नईचा संघ -ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डेरिल मिचेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीक्क्षा पथिराना.

हैदराबादचा संघ -  पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन. 

टॅग्स :चेन्नई सुपर किंग्ससनरायझर्स हैदराबादआयपीएल 2018महेंद्रसिंग धोनीऋतुराज गायकवाड