भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 15:12 IST2025-10-13T15:04:53+5:302025-10-13T15:12:26+5:30
Pooja Shakun Pandey Abhishek Gupta Case: अलिगढमधील एका व्यावसायिकाची हत्या झाली. या हत्येची मास्टरमाईंड निघाली महामंडलेश्वर अन्नपूर्णा भारती उर्फ पूजा शकून पांडे. या प्रकरणामुळे पूजा पांडे वयाने लहान असलेल्या मुलांसोबत शरीरसंबंध ठेवायची असेही समोर आले. हत्याकांडानंतर ती फरार झाली, पण पोलिसांनी तिला पकडलेच!

Pooja Shakun Pandey Abhishek Gupta Crime Story: उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये एका व्यावसायिकाची हत्या झाली, अभिषेक गुप्ता असं तरुणाचं नाव. पोलिसांनी तपास केला आणि हत्येची मास्टरमाईंड निघाली महामंडलेश्वर अन्नपूर्णा भारती उर्फ पूजा शकून पांडे!
हत्याकांडानंतर भगवी वस्त्रे धारण पूजा पांडेने केलेले कारनामे समोर आले. पूजा पांडे वयाने लहान असलेल्या युवकांसोबत शरीरसंबंध ठेवायची. त्यातच तिने लहान असलेल्या अभिषेक गुप्ता या व्यावसायिक तरुणासोबत संबंध प्रस्थापित केले आणि भागीदारीच्या मुद्द्यावर वाद झाल्यावर त्याला संपवले.
२६ सप्टेंबर रोजी अलिगडमधील टीव्हीएस शोरुमचा मालक अभिषेक गुप्ता याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पूजा पांडेने तीन लाखांची सुपारी देऊन त्याची हत्या केली. त्यासाठी एक लाख रुपये रोख दिले गेले होते. या हत्याकांडात पूजा पांडेचा पती अशोक कुमार पांडेही सामील होता. त्यालाही अटक करण्यात आली आहे.
महामंडलेश्वर अन्नपूर्णा भारती उर्फ पूजा पांडेने अभिषेक गुप्तासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर टीव्हीएस शोरुममध्ये भागीदार बनवण्यासाठी दबाव टाकला. मात्र, गुप्ताने नकार दिल्यानंतर त्याची हत्या केली. तेव्हापासून पूजा पांडे फरार होती. तिला राजस्थानातून अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक नीरज कुमार जादौन यांनी सांगितले की, राजस्थानातील भरतपूरमध्ये तिला बेड्या ठोकण्यात आल्या. मागील तीन आठवड्यांपासून ती पोलिसांना गुंगारा देत होती.
अभिषेक गुप्ताच्या हत्येनंतर पूजा पांडेला महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आले. हत्येनंतर ती गाझियाबाद, हरिद्वार, मुरादाबाद, प्रयागराज आणि जयपूरला गेली. पोलीस तिचा पाठलाग करत होते. माहितीच्या आधारे पोलिसांनी तिला राजस्थानात गाठले.
जेव्हा अभिषेक गुप्ता हत्या प्रकरणात पूजा पांडेंचे नाव तपासातून समोर आले आणि तिचा पती अशोक कुमार पांडे याला अटक करण्यात आली; तेव्हा पूजा पांडे फरार झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, तिने भगवी वस्त्रे काढून टाकली आणि पळून जाण्यासाठी बुरखा घातला होता. जेव्हा तिला पकडले तेव्हा तिने गुलाबी ड्रेस घातलेला होता.