सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! ऑनलाइन बुकींग करायचे अन्…; देहविक्रीचा सौदा पाहून पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 05:38 PM2022-02-09T17:38:51+5:302022-02-09T17:42:40+5:30

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ इथं मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवत असल्याचं उघड झालं आहे. याठिकाणी काम करणाऱ्या युवतीनं पोलीस आयुक्तांना माहिती देताच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना छापा मारुन पार्लरमधून ६ युवकांना आणि ८ युवतींना ताब्यात घेतले.

युवतीच्या तक्रारीत म्हटलंय की, सहा महिन्यापूर्वी मसाज पार्लरमध्ये तिला जॉबची ऑफर आली होती. जॉबच्या शोधात ती त्याठिकाणी गेल्यानंतर तिला बंदिस्त केले. त्यानंतर विरामखंडच्या एका खोलीत डांबले. तेथूनच सगळं सेक्स रॅकेट सुरु असायचं.

ही युवती कसंतरी करुन त्याठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाली. नंतर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात पोहचून तिनं या रॅकेटचा खुलासा केला. बुधवारी पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला त्यानुसार तपास पथकानं धाड टाकून ६ युवक आणि ८ युवतींना ताब्यात घेतले.

पकडलेल्या युवकांमध्ये अनिल कुमार, उदय पटेल, पीके. छोटू, राजकुमार, ऋतिक यांचा समावेश आहे. तर पोलिसांच्या पथकानं पार्लरहून ८ लोकांनाही ताब्यात घेतले. या सर्वांना गोमतीनगर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. सध्या पोलीस युवतींची चौकशी करत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, मसाज पार्लरच्या संचालकांनी ऑनलाइन App बनवला होता. ज्या माध्यमातून कस्टमर बुकींग व्हायची. याच अँपच्या माध्यमातून युवतींचे फोटो पाठवले जायचे. दर ठरवायचे आणि सर्व निश्चित झाल्यानंतर सांगितलेल्या ठिकाणी युवतींना पाठवायचे. जी युवती विरोध करायची तिला धमकावणे आणि मारहाण करणे असे प्रकार व्हायचे.

युवतींना नशेच्या गोळ्या दिल्या जायच्या. सेक्स रॅकेट चालवणारा युवतींना लग्झरी गाड्यातून कस्टमरकडे पाठवायचे. युवतीला एकटं पाठवू नका असं ग्राहकांना सांगायचे. परत घेऊन जाण्यासाठी लग्झरी गाडी पाठवली जायची. जेणेकरुन कुठल्याही युवतीनं पळण्याचा प्रयत्न करु नये

मसाज पार्लरसाठी देशातील अनेक राज्यांतून युवतींना जॉबच्या नावाखाली बोलावलं जायचं. त्यानंतर युवतींना बंदी बनवून त्यांच्याकडून देहविक्री केली जायची. पोलिसांच्या माहितीनुसार, या पार्लरमध्ये पूर्वोत्तर राज्यात, मुंबई, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि काश्मीरमधील युवतींचा समावेश असल्याचं सांगितले गेले.

ज्या युवतीनं याबाबत पोलीस आयुक्तांना तक्रार केली. त्यात स्थानिक चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही आरोप करण्यात आला आहे. तक्रार केल्यानंतर कुणीही याची दखल घेतली नाही. त्यामुळे पीडित युवतीने पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली.