Shocking! सासूने ५ लाखांची सुपारी देऊन केली जावयाची हत्या, कारण वाचून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 12:18 PM2021-08-04T12:18:36+5:302021-08-04T12:33:58+5:30

पोलिसांनी सांगितलं की, सासू ग्यारसीच्या पतीचं काही वर्षापूर्वी निधन झालं होतं. पतीचं पेंशन आणि इतर संपत्ती मिळून ती घर चालवत होती. सासूसोबत पोलिसांनी शेजाऱ्यांनाही अटक केली आहे.

राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका सासूने आपल्या जावयाची हत्या केली. जावयाच्या हत्येसाठी सासूने पाच लाख रूपयांची सुपारी दिली होती. हत्येच्या या कटात सासूने तिच्या शेजाऱ्यांना सामिल करून घेतलं होतं. जोधपूर पोलिसांनी याप्रकरणी सांगितलं की, आरोपी सासूसोबत इतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जोधपूरमधील सुरपुरा बांध रोडवर एक ऑगस्टला एका प्लास्टिकच्या पोत्यात एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी याचा तपास सुरू केला होा. तेव्हा मृत व्यक्तीचं नाव विनोद असल्याचं समजलं.

पोलिसांनी सांगितलं की, विनोद ३१ जुलैला सासरी आली होता. तो त्याच्या सासूला भेटल्यावर जरा घरातून बाहेर पडला तेव्हा प्लॅननुसार जब्बर सिंह आणि धनराजने त्याचा पाठलाग केला. ते त्याला एका अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. तिथे त्यांनी त्याची हत्या केली आणि मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून फेकला.

याप्रकरणी एडीसीपी यांनी सांगितलं की, विनोदने मदेरणा कॉलनीतील तरूणीसोबत ४ वर्षाआधी लव्ह मॅरेज केलं होतं. तो मजुरी करत होता. ज्यामुळे त्याचा सासूसोबत वाद सुरू होता. नुकतीच त्याची पत्नी माहेरी आली होती. हत्येच्या दिवशीही त्याचं मोबाइल लोकेशन मदरेणा कॉलनी होतं.

त्याच्या शेवटच्या मोबाइल लोकेशनच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला. साध्या कपड्यांमध्ये पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी हत्येच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात विनोद एक सासरी जाताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी त्याची सासू ग्यारसी देवीची चौकशी केली.

आधी तर आरोपी सासूने उडवा उडवीची उत्तरे दिली. पण नंतर पोलिसांनी हिसका दाखवला तेव्हा तिने गुन्हा मान्य केला. आरोपी सासूने पोलिसांना सांगितलं की, तिने शेजारी जब्बर सिंह आणि धनराज पुरीच्या मदतीने जावई विनोदची हत्या करण्यासाठी ५ लाख रूपयांची सुपारी दिली होती.

पोलिसांनी जब्बर सिंह आणि धनराजची चौकशी केली तर त्यांनी मान्य केलं की, विनोदच्या सासूच्या सांगण्यावर विनोदची हत्या केली आणि त्याचा मृतदेह फेकून दिला. आरोपींनी सांगितलं की, ग्यारसी देवीला जावयाचं राहणीमान, त्याची वागणूक आवडत नव्हती. त्यामुळे तिने जावयाची हत्या केली.