तो तहसीलदार सोडा! खजिनदाराच्या घरात ट्रंकचे ट्रंक सोने चांदी सापडले; पोलीस मोजून दमले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 12:19 PM2020-08-20T12:19:44+5:302020-08-20T12:31:52+5:30

पोलिसांनी जेव्हा छापा टाकला तेव्हा त्याच्या घरात मोठमोठे ट्रंक सापडले. यामध्ये सोने. चांदी आणि रोख रक्कम सापडली. हे सारे काळे धन 8 मोठ्या ट्रंकमध्ये लपवून ठेवण्यात आले होते.

हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वी एका तहसीलदाराच्या घरात घबाड सापडले होते. या तहसीलदाराला आंध्र प्रदेशमधील अनंतपूरच्या कोषागार (treasury) विभागाच्या कर्मचाऱ्याने कमालीचे मागे टाकले आहे. या कर्मचाऱ्याकडे ट्रंकच्या ट्रंक भरून सोन्या, चांदीचे दागिने भांडी सापडल्य़ाने छाप्यासाठी गेलेल्या पोलिसांचेही डोळे विस्फारले आहेत.

या खजिनदार कर्मचाऱ्याकडून पोलिसांनी मोठ्या संख्येने सोने, चांदी, रोख रक्कम, एफडी, पैसे दिल्याचे वादा केलेले कागदपत्र, कार आणि महागडी बाईकसर अन्य संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी जेव्हा छापा टाकला तेव्हा त्याच्या घरात मोठमोठे ट्रंक सापडले. यामध्ये सोने. चांदी आणि रोख रक्कम सापडली. हे सारे काळे धन 8 मोठ्या ट्रंकमध्ये लपवून ठेवण्यात आले होते.

एवढी सारी संपत्ती पाहून पोलिसांचेही डोळे विस्फारले. पोलीस अधिकारीही पाहत राहिले. अखेर हे सोने, चांदी मोजण्यासाठी शहरातील एका मोठ्या ज्वेलरकडून मशीनच मागवावी लागली.

हा जो ट्रेजरी कर्मचारी होता, त्याचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. मात्र, नोकरीदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने मुलाला अनुकंपाखाली ट्रेझरी विभागात 2006 मध्ये नोकरी मिळाली होती.

पोलिसांनी सांगितले की, हे घबाड मनोज कुमारच्या बंगल्यात सापडले आहे. तो ट्रेझरी विभागात वरिष्ठ सहाय्यक आहे.

मनोज कुमारने हे सारे सामान त्याचा ड्रायव्हर नागालिंगा याच्या काकाच्या खोलीत लपविले होते.

धक्कादायक म्हणजे मनोज कुमारकडे सोन्या चांदीबरोबर शस्त्रेही सापडली आहेत. यामध्ये तीन 9 एमएमची पिस्तूल, 18 छोटे बॉम्ब, एक एअर गन आदी सापडले आहे.

डीएसपींनी सांगितले की, त्याच्याकडे 2.42 किलो सोने, 84.10 किलो चांदी आणि 15.55 लाखांची रोख रक्कम सापडली. तसेच त्याच्या नावावर 49 लाखांचे फिक्स डिपॉझिट, 27.05 लाखांचे बॉन्डही सापडले आहेत.

पोलिसांनी त्याच्याकडून दोन चारचाकी, सात टू व्हीलर आणि चार ट्रॅक्टरही जप्त केले आहेत. दुचाकींमध्ये एक महागडी बाईकही आहे.

जमिन खरेदी-विक्री व्यवहारात सहकार्य करण्यासाठी तहसिलदाराने ही 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. एसीबीच्या पथकाने तहसीलदार बलाराजू नागराजू यांच्या घरावर छापा टाकला.

Read in English