IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 14:30 IST2025-12-27T14:26:57+5:302025-12-27T14:30:46+5:30
20 डिसेंबरच्या रात्री उदयपूरमध्ये एका कंपनीचा सीईओ वाढदिवसाची पार्टी करत होता. त्या पार्टीसाठी कंपनीत मॅनेजर असलेली महिला आली. रात्री दीड वाजेपर्यंत त्यांची पार्टी चालली. त्यानंतर मॅनेजरवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. काय घडलं, एफआरआयमध्ये काय आहे?

राजस्थानातील उदयपूरमध्ये आयटी कंपनीत व्यवस्थापक असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. व्यवस्थापक महिलेने कंपनीचा सीईओ, कार्यकारी प्रमुख असलेली महिला आणि तिच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत.

पीडितेने पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार की, २० डिसेंबरच्या रात्री सीईओचा वाढदिवस आणि नवीन वर्षानिमित्त पार्टी ठेवण्यात आली होती. शोभागपुरा परिसरातील एका हॉटेलमध्ये ही पार्टी होती. पीडित महिला रात्री ९ वाजता हॉटेलमध्ये पोहोचली. तिथे सीईओ आणि इतर वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचारी पार्टी करत होते.

रात्री १.३० वाजेपर्यंत पार्टी चालली. सगळे दारू प्यायले. पार्टी सुरू असतानाच पीडित महिलेची दारूमुळे शुद्ध हरपली. अर्ध बेशुद्धावस्थेत महिलेला काही लोक घरी सोडण्याबद्दल बोलत होते. त्याचवेळी कंपनीची कार्यकारी प्रमुख असलेली महिला तिला सोबत चल म्हणाली. पीडित महिलेला १.४५ वाजता कारमध्ये बसवण्यात आले. त्या कारमध्ये आधीच सीईओ आणि महिलेचा पती बसलेला होता.

पीडित महिलेला घरी सोडण्यासाठी निघाले. वाटेत ते एका ठिकाणी थांबले. धूम्रपान करण्याच्या गोष्टी खरेदी केल्या. त्यांनी पीडितेलाही धूम्रपान करायला लावलं. त्यानंतर पीडित महिलेची पूर्णपणे शुद्ध हरपली. काही वेळ गेल्यानंतर ती शुद्धीवर आली. तिला विचित्र अवस्थेत पडलेली होती. सीईओ, महिला आणि तिचा पती तिच्यासोबत नको ते कृत्य करत होते. अर्धवट शुद्धीत असलेल्या पीडितेवर त्यांनी नंतर तिच्या बलात्कार केला.

रात्री बलात्कार केल्यानंतर तिघांनी पहाटे पाच वाजता पीडित महिलेला घरी सोडले. जेव्हा पीडिता पूर्ण शुद्धीत आली, तेव्हा तिने बघितले की, एका कानातील रिंग, सॉक्स, अंडरगारमेट्स नाहीये. त्याचबरोबर तिच्या गुप्तांगावर जखमाही झालेल्या होत्या. कारच्या डॅशकॅममध्येही ही घटना कैद झाली असून, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तिघांना अटक करण्यात आली आहे.

















