मित्राच्या आईला I Love You मेसेज करून शारीरिक संबंधासाठी टाकला दबाव अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 18:23 IST2022-03-03T18:20:07+5:302022-03-03T18:23:29+5:30

Physical Relationship Case : लुधियाना - मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना लुधियानात घडली आहे. येथे २४ वर्षीय तरुणाने मित्राच्या आईला इंटरनेट मीडिया(Internet Media) यावर अश्लील मेसेज पाठवून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला.

मित्राच्या आईला अश्‍लील मेसेज पाठवून तरुणाने आक्षेपार्ह छायाचित्रावर महिलेचा चेहरा टाकून फोटो टेम्पर केला. यासोबतच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबावही निर्माण करण्यात आला.

ही बाब उघडकीस येताच पोलिसांनाही धक्का बसला. आरोपी तक्रारदार महिलेच्या मुलाचा मित्र असल्याचेही तपासात समोर आले आहे.

आता सदर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विनयभंग, आयटी अॅक्ट व अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. इन्स्पेक्टर गुरप्रीत सिंग यांनी सांगितले की, आरोपी तरुणाचे नाव मनदीप सिंग असे आहे. त्याच्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला आहे. 22 फेब्रुवारी रोजी पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत एका 44 वर्षीय महिलेने सांगितले की, 10 जानेवारी रोजी तिला एका अज्ञात व्यक्तीकडून मोबाईलवर मेसेज आला, ज्यामध्ये आय लव्ह यू असे लिहिले होते.

यानंतर २१ फेब्रुवारीला पुन्हा दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून महिलेच्या आक्षेपार्ह छायाचित्रावर माझ्या चेहऱ्याचा फोटो असलेला मेसेज आला. या खाली आरोपीने महिलेला त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचे पत्र लिहिले. त्यानंतर ती घाबरली.