डॉक्टर तुम्ही सुद्धा... पती घरातच चालवायचा सेक्स रॅकेट, शिक्षिका पत्नीचा विरोध असल्याने रचला हत्येचा कट 

By पूनम अपराज | Published: February 25, 2021 09:25 PM2021-02-25T21:25:15+5:302021-02-25T21:41:38+5:30

Sex Racket : उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात शिक्षिकेच्या हत्येच्या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे.

शास्त्री नगरमधील शिक्षिकेच्या हत्येचा आरोपी पती, तंबू व्यापारी संजय लूथरा आणि डॉक्टर रजत भारद्वाज घरात वेश्या महिलांना घरात बोलावून सेक्स रॅकेट चालवत  असत. शिक्षिकेने याला विरोध केला. या कारणामुळे तिला जीवे ठार मारण्यात आले. हत्येप्रकरणी अटक झालेल्या आरोपींनी चौकशीत याचा खुलासा केला. (All Photo - Amar Ujala)

पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात हजर केले. त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.शास्त्री नगर सेक्टर २ मधील रहिवासी संजय लुथरा याने तीन दिवसांपूर्वी पत्नी चंदाचा खून केला होता.

शास्त्री नगर सेक्टर २ मधील रहिवासी संजय लुथरा याने तीन दिवसांपूर्वी पत्नी चंदाचा खून केला होता. संजयचा मित्र डॉ. रजत भारद्वाजही या हत्येच्या कटात सामील होता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही म्हणून नौचंदी पोलिसांनी संजय लूथराला पोलिस स्टेशनमधून क्लीन चिट दिली. मुलीच्या तक्रारीवरून एसएसपीने चौकशी केली. संजयच्या मोबाइलमध्ये एक फोटो सापडला होता, ज्यामध्ये डॉक्टर महिलेचा गळा दाबताना दिसत आहे. या फोटोच्या आधारे पोलिसांनी डॉक्टरला अटक केली.

बुधवारी दोघांची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय आणि डॉ. रजत हे जवळचे मित्र आहेत. संजयची पत्नी शिक्षिका होती. चंदा जेव्हा मुलांना शिकवण्यासाठी शाळेत जात असे तेव्हा संजय आणि रजत घरी वेश्यांना बोलावत असत. हे कळताच चंदाने अनेकदा या गोष्टीला विरोध केला. दोन महिन्यांपासून दोघे चंदाला जीवे मारण्याचा कट रचत होते. त्याच्या कटानुसार संजय चंदाला नशायुक्त पदार्थ खायला घालतो आणि नंतर रात्रीच दोघेही मिळून तिचा खून करतात.

जप्त केलेल्या वस्तू फॉरेन्सिक लॅबला पाठविल्या जातील - पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आणि घटनास्थळी उश्या, नशायुक्त पदार्थ आणि कपडे जप्त केले. बुधवारी पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले, तेथून त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. पोलिसांनी जप्त केलेल्या वस्तू फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्याची तयारी केली आहे.

आधी घटस्फोट आणि नंतर कोर्ट मॅरेज - शिक्षिका चंदाचा संजय लुथराच्या चुकीच्या वागण्यामुळे बर्‍याचदा त्यांच्याशी वाद होत असे. 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. नंतर ती माहेरी निघून गेली. संजयने माफी मागितली आणि त्यानंतर पुन्हा चंदाशी कोर्ट मॅरेज केले. पण संजयने आपली वागणूक बदलली नाही. त्याने मित्र रजत याच्यासमवेत पत्नीची हत्या केली. 15 दिवसांपूर्वी चंदा आणि संजय लुथरा यांच्यात भांडण झाले होते.