"अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याची विल्हेवाट लाव’’, वहिनीचे म्हणणे ऐकले आणि दिराने...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 09:22 AM2021-03-29T09:22:02+5:302021-03-29T09:25:39+5:30

crime News : गेल्या काही काळात अनैतिक संबंधांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या अनैतिक संबंधांतून घडलेली एक धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. येथे एका तरुणाची चाकूने गळा कापून हत्या करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यावर त्यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या काही काळात अनैतिक संबंधांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या अनैतिक संबंधांतून घडलेली एक धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. येथे एका तरुणाची चाकूने गळा कापून हत्या करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यावर त्यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वहिनीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळे लहान भावाने मोठ्या भावाचा क्रूरपणे गळा कापून त्याची हत्या केली.

ही घटना राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील पनवाड पोलीस ठाणे क्षेत्रातील सरखंडिया परिसरात घडली आहे. या घटनेबाबत माहिती देताना खानपूरचे डीएसपी राजीव परिहार यांनी सांगितले की, मृत युवक बलराम याच्या पत्नीचे बलरामचा धाकटा भाऊ असलेल्या संजयशी अनैतिक संबंध होते.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने सांगितले की, मृत तरुण हा आरोपीसोबत त्याच्या पत्नीच्या असलेल्या अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत होता. त्यामुळे मृत तरुणाच्या पत्नीने आरोपी असलेल्या तिच्या दिराला अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या आपल्या पतीची विल्हेवाट लावण्यास सांगितले. त्यानंतर ती माहेरी निघून गेली.

त्यानंतर आरोपी असलेल्या लहान भावाने आपल्या मोठ्या भावाला निमित्त काढून सरखंडिया येथील जंगलात नेले. तिथे चाकूने गळा कापून त्याची हत्या केली. या घटनेनंतर आरोपी भाऊ पोलिसांना गुंगारा देण्यासाठी घटनास्थळावर देखील गेला होता.

या प्रकरणी कॉल डिटेल आणि तपासानंतर पोलिसांनी आरोपी भाऊन संजयच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे. तसेच आता पोलीस या प्रकरणात मृताच्या पत्नीच्या सहभागाचीही चौकशी करत आहेत.