खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 09:56 PM2020-06-10T21:56:09+5:302020-06-10T22:34:18+5:30

आज आम्ही तुम्हाला लव्ह जिहादची एक थरकाप उडवणाऱ्या घटनेबद्दल सांगणार आहोत. अशिक्षित शाकीबने अमन अशी ओळख सांगून बी.कॉम पर्यंत शिकलेल्या मुलीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर लग्नाच्या नावाखाली त्याने तरुणीला 25 लाख रुपये आणि मुलीचे 15 तोळे सोने आणण्यास सांगितले.

जेव्हा तरुणीला कळाले तो अमन नसून शाकीब आहे तेव्हा तिच्या पायाखालची जणू जमीनच सरकली आणि खोट्या प्रेमाचं खरं सत्य उघडकीस आले. त्यावेळी निर्दयी शाकीबने ईदच्याआधी चंद्र दिसण्याच्या दिवशीच्या रात्री कुटुंबीय आणि मित्रांच्या मदतीने अंगावर काटा आणेल असे हत्याकांड घडवून आणले, त्याने युवतीचे धड आणि हात तोडले आणि शरीरापासून वेगळे केले.

मूळची हिमाचल प्रदेशातील डेहरा कांगरा येथील रहिवासी असलेली मुलगी बी.कॉमपर्यंत शिकून लुधियानास्थित कंपनीत नोकरीला लागली. त्यानंतर लवकरच, मुलीचे कुटुंब देखील लुधियाना येथे वास्तव्यास होते. त्याठिकाणी तरुणी मेरठच्या लोहया गावातल्या एका तरूणाला भेटली. भेटीनंतर शाकिबने अमन अशी ओळख दाखवून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जवळपास तीन महिन्यांच्या प्रेमसंबंधानंतर तो तिला ईदच्या आधी आपल्या गावी घेऊन आला.

त्याचवेळी जेव्हा तरुणीला वास्तव कळले तेव्हा तिला आश्चर्य वाटले. त्यापासून तरुणीने तरुणास विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शाकिबने ईदच्या अगदी एक दिवस आधी चंद्र दिसण्याच्या रात्री कुटुंब आणि मित्रांच्या मदतीने तिची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निर्दयी शाकीबने त्या महिलेचे धड आणि हात कापले. धड एका विटेला बांधून तलावामध्ये फेकला गेला, तर हात आणि शरीर शेतात खोदलेल्या खड्यात पुरले गेले.

त्यानंतर नराधम आरोपी गुन्हा लपवण्यासाठी फरार झाला. त्याच वेळी, बराच काळ तपास करत असलेल्या मेरठ पोलिसांना अखेर या प्रकरणात यश मिळाले. पोलिसांनी मारेकरी शाकिबसह सहा जणांना अटक केली आणि घटनेचा खुलासा केला. दुसरीकडे एसएसपी अजय साहनी यांनी मंगळवारी खुलासा करताना या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.

पोलिसांनी तरुणीच्या हत्या प्रकरणाचा खुलासा केला, परंतु आरोपीना शिक्षा करण्याचे पुरावे फार कमी आहेत. पोलिसांनी अद्याप तरुणीचा गळा व हातचे तुकडे सापडले नाहीत. अशा परिस्थितीत पोलिसांना मुलीला न्याय मिळवून देण्याचे मोठे आव्हान आहे. आरोपी शाकीब आणि त्याच्या कुटुंबियांनी खुनाची कबुली दिली आहे. मंगळवारी पोलिसांनी पत्रकार परिषदेत ही घटना उघडकीस आणली. आता आरोपीविरोधात न्यायालयात ठोस पुरावे सादर करावे लागतील. पोलिसांनी ताब्यात घेतलेला मृतदेह लुधियाना येथील रहिवासी तरुणीचा होता, हे फक्त आरोपींच्या जबाबातून समोर आले आहे. गुुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. दौराला पोलिस आरोपी शाकिबला रिमांडवर घेेणार आहे.