बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 20:42 IST2025-07-31T20:14:59+5:302025-07-31T20:42:25+5:30
Model Shanta Paul Arrested Crime News: गेल्या ६ वर्षांपासून 'ती' भारतात राहत होती...

Model Arrested Crime News:
कोलकाता पोलिसांच्या एका तुकडीने पश्चिम बंगालमधून एका बांगलादेशी मॉडेलला अटक केली. ती आधी एअरहॉस्टेस होती. त्यानंतर ती मॉडेल आणि अभिनेत्री बनली.
गेल्या ६ वर्षांपासून ती कोलकातामध्ये राहत होती. पार्क स्ट्रीट पोलिस स्टेशनने मॉडेलवर बीएनसीच्या कलम ३३६(३)/ ३३८/ ३४१/ ६१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी महिलेचे नाव शांता पॉल असून ती २८ वर्षांची आहे. ती भाड्याच्या खोलीत राहत होती. पोलिसांनी तिच्या राहत्या घरी छापा टाकून संध्याकाळी ४ वाजता अटक केली.
पोलिसांच्या झडतीदरम्यान, तिचे अनेक बांगलादेशी पासपोर्ट, रीजेंट एअरवेज (बांगलादेश) कर्मचारी कार्ड, ढाका माध्यमिक शिक्षण प्रवेशपत्र या सगळ्या गोष्टी सापडल्या.
धक्कादायक बाब म्हणजे, त्या कागदपत्रांसोबतच तिचे भारतीय आधार कार्ड, भारतीय मतदार कार्ड, विविध पत्त्यांचे रेशन कार्डही सापडले. पोलिसांनी हे सर्व जप्त केले.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताला अॅप कॅबचा व्यवसाय चालवण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी पकडले. ती २०२३ पासून त्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती.
शांता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पत्त्यांसह राहायची. अलिकडेच तिच्याविरूद्ध फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात झाली होती. त्या प्रकरणातही ती वेगळ्याच पत्त्यावर राहत होती.
अधिक माहितीनुसार, ती बांगलादेशातील दोन प्रसिद्ध कंपन्यांसाठी मॉडेल म्हणून काम करत असल्याचे उघड झाले. तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्येही भाग घेतला होता.
शांताच्या घरातून एअरलाइन आयडी कार्डदेखील सापडले. ती आधी एअरहॉस्टेस होती. शांताच्या घरात सापडलेली कागदपत्रे तिने कशाच्या आधारे मिळवली, याचा पोलिस तपास करत आहेत.