Photos : रॉयल कारभार! सुयश- आयुषीचा wedding look व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 11:03 AM2021-10-21T11:03:27+5:302021-10-21T11:10:35+5:30

Suyash tilak: आयुषी भावेसुद्धा सुयशप्रमाणेच अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे. युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी झळकली होती.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे सुयश टिळक. 'का रे दुरावा' या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून सुयश घराघरात पोहोचला.

'का रे दुरावा' ही मालिका लोकप्रिय झाल्यानंतर सुयश 'बापमाणूस', 'दुर्वा' या मालिकांमध्येही झळकला होता. उत्तम अभिनयकौशल्य आणि शांत स्वभाव यामुळे सुयश आज लोकप्रिय अभिनेता आहे.

मराठी कलाविश्वातील चार्मिंग आणि हॅण्डसम बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुयशचे आज असंख्य फॉलोअर्स असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे तो अनेकींच्या गळ्यातलं ताईत आहे. परंतु, सुयश लवकरच बोहल्यावर चढणार असून त्याच्या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत.

काही दिवसांपूर्वीच सुयशचा हळदी आणि संगीत समारंभ पार पडला. या समारंभातील काही फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सुयश अभिनेत्री, नृत्यांगना आयुषी भावे हिच्यासोबत लग्नगाठ बांधणार असून त्यांचा वेडिंग लूक समोर आला आहे.

२१ आणि २२ या दोन दिवसांमध्ये सुयश- आयुषीचा लग्नसोहळा रंगणार आहे. त्यापूर्वी या दोघांचेही वेडिंग लूक व्हायरल झाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये या दोघांनीही पारंपरिक कपडे परिधान केले आहेत. आयुषीने लाल रंगाची साडी नेसली असून सुयशने शेरवानी परिधान केली आहे.

अलिकडेच सुयश- आयुषीचा साखरपुडा पार पडला होता. याविषयीची माहितीदेखील त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.

आयुषी भावेसुद्धा सुयशप्रमाणेच अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे. युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी झळकली होती.

आयुषी इन्स्टाग्रामच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

आयुषी भावेचे सोशल मीडियावर असंख्य फॉलोअर्स असून ती सतत त्यांच्या संपर्कात राहत असते.

सुयश- आयुषीच्या साखरपुड्यातील खास फोटो (फोटो सौजन्य : सुयश टिळक, आयुषी भावे / इन्स्टाग्राम)

Read in English