जबरदस्त परतावा! 'या' बँकांनी ग्राहकांना FD वर वाढीव व्याजदराची भेट दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 06:58 PM2023-09-22T18:58:10+5:302023-09-22T19:01:29+5:30

काही बँकांनी त्यांच्या एफडी व्याजदरात वाढ केली आहे.

अनेक बँकांनी त्यांच्या एफडी व्याजदरात वाढ केली आहे, यामुळे आता ग्राहकांना वाढीव एफडी दरांचा लाभ मिळणार आहे.

ICICI बँक, HDFC बँक, SBI या देशातील मोठ्या बँकांनी सप्टेंबर 2023 मध्ये त्यांच्या FD व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

काही बँकांनी ग्राहकांना एफडी योजनांवर जास्त व्याजदराची भेट दिली आहे. सप्टेंबर महिन्यात व्याजदर वाढवले ​​आहेत त्या बँकांची यादी पाहणार आहोत.

IDBI बँकेने 15 सप्टेंबर 2023 रोजी FD व्याजदरात वाढ केली आहे. यानंतर बँक सामान्य नागरिकांना 3 ते 6.80 टक्के व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3.50 ते 7.30 टक्के व्याजदर मिळत आहेत.

Axis Bank ने 15 सप्टेंबर 2023 पासून काही कालावधीच्या FD योजनांवरील ग्राहकांच्या व्याजदरात 50 बेस पॉईंट्सची वाढ केली आहे. हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू करण्यात आले आहेत. यानंतर, सामान्य ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 3 ते 7.10 टक्के व्याजदर मिळत आहेत.

कोटक महिंद्रा बँकेने 13 सप्टेंबर 2023 रोजी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD चे दर बदलले आहेत. यानंतर, बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 2.75 टक्के ते 7.25 टक्के व्याजदर देत आहे.

येस बँकेने 4 सप्टेंबर 2023 रोजी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD योजनेत बदल केले आहेत. यानंतर बँक सर्वसामान्य ग्राहकांना 3.25 ते 7.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.75 टक्के ते 8.25 टक्के व्याजदर देत आहे.