याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 21:30 IST2025-10-30T21:27:31+5:302025-10-30T21:30:41+5:30

जर एखाद्याने योग्य वेळी, योग्य शेअरमध्ये पैसा लावला, तर हा बाजार रातो-रात आपल्या गुंतवणूकदारांना मालामालही करतो.

खरेतर शेअर बाजाराकडे जोखमेचा खेळ म्हणूनही बघितले जाते. मात्र, “नो रिस्क, नो गेन” अशीही एक म्हण आहे. जर एखाद्याने योग्य वेळी, योग्य शेअरमध्ये पैसा लावला, तर हा बाजार रातो-रात आपल्या गुंतवणूकदारांना मालामालही करतो.

असे अनेक शेअर आहेत ज्यांनी या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अगदी आश्चर्चकारक परतावा दिला आहे. असाच एक शेअर म्हणजे, RRP Semiconductor Ltd चा.

RRP Semiconductor Ltd चा धमाका - सेमीकंडक्टर क्षेत्रातील या कंपनीने, आपल्या गुंतवणूकदारांना या वर्षात छप्परफाड परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरने केवळ 10 महिन्यांतच तब्बल 5541% एवढा परतावा दिला आहे.

1 जानेवरीला RRP Semiconductor चा शेअर ₹185.50 वर होता. जो आता 10464 रुपयांवर पोहोचला आहे. अर्थात एखाद्या गुंतवणूकदाराने 10 महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आता तिचे मूल्य जवळपास 5 लाख रुपये एवढे झाले असते.

गेल्या 6 महिन्यांचा विचार करता या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1100% एवढा परतावा दिला आहे. तर एका महिन्याचा विचार करता 48% एवढा परतावा दिला आहे. 28 ऑक्टोबरला हा शेअर 10259.25 रुपयांवर बंद झाला.

असाच आणखी एक शेअर म्हणजे, Elitecon International Ltd चा. या वर्षाच्या सुरुवातीला हा शेअर केवळ 10.37 रुपयांवर होता. तो आता 156 रुपयांवर पोहोचला आहे. अर्थात या 1400% ने वधारला आहे. मात्र गेल्या एका महिन्यात हा शेअर 26% ने घसरला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)