₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 17:26 IST2025-11-19T17:17:34+5:302025-11-19T17:26:41+5:30

1986 मोध्ये स्थापन झालेली मर्करी ईव्ही-टेक लिमिटेड इलेक्ट्रिक वाहने आणि अक्षय ऊर्जेशी संबंधित उत्पादनांच्या निर्मितीत आणि व्यापारात सक्रीय आहे.

भारतीय शेअर बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मर्क्युरी ईव्ही-टेक लिमिटेडचा शेअर १.१४ टक्क्यांची वधारला असून ₹३८.९६ पर्यंत पोहोचला आहे.

मात्र, गेल्या वर्षभराचा विचार करता, हा शेअर सहा महिन्यांत ४० टक्क्यांनी तर गेल्या एका वर्षात ६२ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. पण गेल्या पाच वर्षांत या शेअरने तब्बल 5884.62% चा जबरदस्त परतवा दिला आहे.

तेजी मागचं कारण काय? - कंपनीने गुजरातमधील पोरबंदर येथे नुकतेच एका नव्या शोरूमचे उद्घाटन केल्याची घोषणा केली आहे. यानंतर, कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी आल्याचे दिसत आहे.

यासंदर्भात कंपनीने १८ नोव्हेंबर रोजी स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली. यात, गुजरातमधील पोरबंदर येथे नवीन शोरूमचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे उद्घाटन कंपनीच्या व्यवसाय विस्तार धोरणाचा एक भाग असून यामुळे बाजारातील उपस्थिती आणि ग्राहकांपर्यंतची पोहोच आणखी मजबूत होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील कंपनीच्या कामगिरीने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवला आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री ५१ टक्क्यांनी वाढून ₹३४.०१ कोटींवर पोहोचली. तर निव्वळ नफा ३५ टक्क्यांनी वाढून ₹१.७२ कोटी रुपयांवर पोहोचला.

तसेच, पहिल्या सहामाहीत विक्री १४२ टक्क्यांनी वाढून ₹५६.५८ कोटी आणि नफा ४३ टक्क्यांनी वाढून ₹२.९९ कोटींवर पोहोचला. गेल्या वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत, सप्टेंबर तिमाहीतील नफा १५.७ टक्क्यांनी वाढून ₹१.८४ तर परिचालन महसूल ७५ टक्क्यांवरून अधिकने वाढून ₹34 कोटींवर पोहोचला आहे.

1986 मोध्ये स्थापन झालेली मर्करी ईव्ही-टेक लिमिटेड इलेक्ट्रिक वाहने आणि अक्षय ऊर्जेशी संबंधित उत्पादनांच्या निर्मितीत आणि व्यापारात सक्रीय आहे. कंपनीच्या उत्पादन साखळीत इलेक्ट्रिक स्कूटर, कार, बसेस आदीचा समावेश आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)