दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 12:50 IST2025-10-10T12:20:51+5:302025-10-10T12:50:42+5:30
Tax on Diwali Gifts : दिवाळी बोनस पूर्णपणे करपात्र आहे की नाही याबद्दल अनेक कर्मचारी गोंधळलेले असतात.

दिवाळी जवळ येताच प्रत्येक कर्मचाऱ्याला यावर्षी कंपनीकडून किती बोनस मिळेल, याची उत्सुकता लागते. कंपनी रोख रक्कम, मिठाई, कपडे किंवा गिफ्ट वाऊचर अशा स्वरूपात बोनस देऊ शकते.
अनेक लोकांचा गैरसमज असतो की सणासुदीला कंपनीकडून मिळालेली भेट किंवा बोनस करमुक्त असतो. परंतु, आयकर विभागाचे नियम याबद्दल काही वेगळे सांगतात.
कंपनीने कर्मचाऱ्याला दिलेली भेटवस्तू किंवा गिफ्ट वाऊचरची किंमत ५,००० रुपयांपर्यंत असेल, तर त्यावर कोणताही आयकर लागत नाही. ही मर्यादा कर्मचाऱ्यांसाठी करमुक्त आहे.
जर भेटवस्तूची किंमत (उदा. महागडा मोबाईल किंवा ज्वेलरी) ५,००० रुपयांपेक्षा जास्त झाली, तर त्या भेटवस्तूच्या संपूर्ण मूल्यावर कर लागतो.
कर्मचाऱ्याला कंपनीकडून मिळणारा रोख बोनस हा थेट पगाराचा भाग मानला जातो. या बोनसच्या रकमेला कोणतीही वेगळी सूट मिळत नाही.
रोख बोनस तुमच्या एकूण वार्षिक उत्पन्नामध्ये जोडला जातो आणि त्यावर लागू होणाऱ्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार कर आकारणी होते.
जर कर्मचाऱ्याने हा बोनस आपल्या आयकर रिटर्नमध्ये घोषित केला नाही, तर आयकर विभागाकडून कर चुकवल्याबद्दल नोटीस येण्याची शक्यता असते, त्यामुळे पारदर्शक व्यवहार ठेवा.
सध्या लागू असलेल्या २०२५ च्या नवीन कर प्रणालीनुसार, जर तुमचे वार्षिक उत्पन्न ४ लाख रुपयांपर्यंत असेल, तर कोणताही कर लागणार नाही. ही प्रणाली आता डिफॉल्ट आहे.
नवीन कर प्रणालीमध्ये १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर ६०,००० रुपयांची सवलत मिळते. मात्र, रोख बोनस हा पूर्णपणे टॅक्सेबल असल्याने तो उत्पन्नात जोडणे आवश्यक आहे.