नोकरदार लोकांसाठी Tax वाचवण्याचे 11 मार्ग, ITR भरण्यापूर्वी जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 11:38 AM2021-12-26T11:38:39+5:302021-12-26T11:58:19+5:30

Tax information : आयकर रिटर्न (Income Tax Return) भरण्याच्या शेवटच्या दिवसांत बहुतेक लोक कर वाचवण्याच्या प्रयत्नात असतात.

नवी दिल्ली : नोकरदार लोकांसमोर (Salaried calss) कर (Tax) वाचवणे हे मोठे आव्हान आहे. आयकर रिटर्न (Income Tax Return) भरण्याच्या शेवटच्या दिवसांत बहुतेक लोक कर वाचवण्याच्या प्रयत्नात असतात. परंतु थोडेसे नियोजन करून, आपण कराचा एक मोठा हिस्सा वाचवू शकता, यासाठी सरकारने स्वतः अनेक मार्ग दिले आहेत, ज्याद्वारे आयकर वाचवता येतो. दरम्यान, आम्ही तुम्हाला 80C अंतर्गत येण्याचे 11 मार्ग सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही वार्षिक 1.5 लाख रुपयांचा कर वाचवू शकता.

तुम्ही 5 वर्षांच्या मुदत फिस्क्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केल्यास, तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. सध्या अशा एफडीवर 7-8 टक्के निश्चित व्याज उपलब्ध आहे. परंतु यावर मिळणारे व्याज करपात्र असते. कर बचत एफडींना फक्त कलम 80C अंतर्गत सूट आहे.

पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड ही सरकारी बचत योजना आहे. तुम्ही सर्व बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन गुंतवणूक करू शकता. त्याला 15 वर्षांचा लॉक इन कालावधी आहे. त्याचे व्याज दर प्रत्येक तिमाहीत बदलतात. पूर्वी 8% पेक्षा जास्त व्याज मिळायचे, पण आता 7.1% मिळते. पीपीएफवर मिळणारे व्याज करमुक्त असते.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम म्हणजेच ELSS हा गुंतवणुकीचा एक चांगला मार्ग मानला जातो. त्याचा लॉक इन पीरियड 3 वर्षांचा आहे. त्याच्या परताव्यावर 11% दीर्घकालीन भांडवली नफा कर लागू होतो. LTCG एका आर्थिक वर्षात 1 लाख रुपयांपर्यंतच्या रिडम्प्शनवर करमुक्त आहे, 10% कराच्या अधीन आहे. नावाप्रमाणेच, त्यातील 80% इक्विटीमध्ये गुंतवले जाते.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर 5 वर्षांसाठी व्याजदर निश्चित केला जातो. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर वार्षिक 6.8% व्याज आहे. ही एक पारंपारिक आणि जुनी बचत योजना आहे, ही गुंतवणूक अशा लोकांनी निवडली आहे, ज्यांना जास्त धोका पत्करावा लागत नाही. तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये किती रक्कम गुंतवू शकता याची मर्यादा नाही. परंतु एका आर्थिक वर्षात केवळ 1.5 लाख रुपयांपर्यंतच कर सूट मिळू शकते.

जीवन विमा पॉलिसीचे अनेक प्रकार आहेत. टर्म इन्शुरन्स, ULIPs आणि एंडोमेंट प्लॅनद्वारे तुम्ही वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. यासाठी विमा संरक्षण वार्षिक प्रीमियमच्या 10 पट असावे.

नॅशनल पेन्शन स्किम ही स्वेच्छानिवृत्ती योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीसाठी पैसे जमा करू शकता आणि निवृत्तीनंतर मासिक पेन्शन घेऊ शकता. यामध्ये तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंत टॅक्स वाचवू शकता. तुम्ही 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत कर वाचवू शकता, परंतु 80CCD (1B) अंतर्गत 50,000 रुपयांचा अतिरिक्त कर वाचवू शकता.

जर तुम्ही होम लोनचे ईएमआय भरत असला तर तुम्हाला कळेल की त्याचे दोन भाग आहेत, पहिले मूळ रक्कम (प्रिंसिपल अमाऊंट) आणि दुसरे व्याज. प्रिंसिपल अमाऊंटवर, तुम्ही 80C अंतर्गत वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. तर व्याजावर वेगळा कर लाभ मिळतो.

जर तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी ट्यूशन फी भरली तर तुम्ही 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांचा क्लेम करू शकता.

संघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी दरमहा त्यांच्या कमाईमधील 12% रक्कम EPF मध्ये गुंतवतात. 80C अंतर्गत, यावर वार्षिक 1.5 लाखांपर्यंत सूट उपलब्ध आहे.

सिनिअर सिटिजन सेव्हिंग स्कीमचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. ही योजना 60 वर्षे ओलांडलेल्या लोकांसाठी आहे. साधारणपणे त्याचे व्याजदर FD पेक्षा जास्त असतात. एप्रिल-जून तिमाहीसाठी याचा व्याजदर 7.4 % आहे.

ज्या पालकांना मुली आहेत, त्यांच्यासाठी मोदी सरकारची योजना चांगली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजना खाते उघडू शकता. या योजनेची मुदत 21 वर्षे किंवा 18 वर्षांनंतर तिचे लग्न होईपर्यंत आहे. हे EEE च्या श्रेणीत येते, म्हणजेच गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटी यावर कर आकारला जात नाही. पीपीएफ सारखे. तुम्ही ही योजना वार्षिक 250 ते 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसह सुरू करू शकता. सध्या त्यावर 7.6 टक्के व्याज मिळत आहे.