TATA चा प्लान यशस्वी! स्टील क्षेत्रातील सरकारी कंपनीची केली खरेदी; १२ हजार कोटींना डील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 04:03 PM2022-01-30T16:03:25+5:302022-01-30T16:06:21+5:30

या कंपनीतील ९३ टक्के हिस्सा विकण्यासाठी सरकारने बोली मागवल्या होत्या. त्यात टाटाने बाजी मारल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून TATA ग्रुपमधील अनेकविध कंपन्या जबरदस्त कामगिरी करत आहेत. अलीकडेच एअर इंडियाची मालकी मिळाल्याने टाटा समूहामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यातच आता टाटा ग्रुपमधील एका कंपनीने स्टील क्षेत्रातील मोठी कंपनी खरेदी केली आहे.

नीलाचल इस्पात निगमचे निर्गुंतवणुकीचे काम पूर्ण झाले आहे. टाटा स्टीलने नीलाचल इस्पात निगमसाठी बोली लावली होती. लवकरच याबाबतची औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे.

नीलाचल इस्पात निगमच्या निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेत ३ कंपन्या शर्यतीत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, नीलाचल इस्पात निगमच्या निर्गुंतवणुकीसाठी ३ कंपन्यांकडून निविदा प्राप्त झाल्या होत्या.

नीलाचल इस्पात निगमच्या निर्गुंतवणुकीसाठी टाटा स्टील, जेएसपीएल आणि जेएसडब्ल्यू स्टीलचा या कंपन्यांनी बोली लावली होती. एनआयएनएल (NINL) मध्ये भेल (BHEL) चा ०.६८ टक्के हिस्सा आहे. एमएमटीसीला भागविक्रीची रक्कम स्वतंत्रपणे मिळेल.

नीलाचल इस्पात निगमच्या निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेत टाटा स्टीलने सर्वात मोठी बोली लावली होती. एनआयएनएल (NINL) चे मूल्यांकन ६ ते ७ हजार कोटी रुपये होते. त्यासाठी टाटा स्टीलने १० ते १२ हजार कोटींच्या दरम्यान बोली लावली आहे.

नीलाचल इस्पात निगममध्ये एमएमटीसी (MMTC) ची ४९ टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. सरकारने ९३ टक्के हिस्सा विकण्यासाठी आरएफपी जारी केला होता. झी बिझनेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :टाटाTata