TATA Group : अंबानी, बेझोसना टक्कर देण्याची तयारी; टाटा ग्रुपकडून मोठ्या प्लानवर काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 03:01 PM2022-03-29T15:01:24+5:302022-03-29T15:15:02+5:30

TATA Group : पाहा काय आहे टाटा समूहाचा प्लान.

टाटा समूहाची (TATA Group) होल्डिंग कंपनी टाटा सन्स (TATA Sons) काही फर्म्समधून थोडा हिस्सा विकत ग्लोबल प्रायव्हेट इक्विटी फर्म आणि स्ट्रॅटेजिक इनव्हेस्टर्सकडून निधी जमवण्याच्या पर्यायांवर विचार करत आहे. ई कॉमर्स (E-Commerce) आणि क्लिन एनर्जी (Energy) सारख्या व्यवसायात विस्तार केला जावा यासाठी कंपनी या विचारात आहे.

टाटा समूह सुरुवातीला टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लि., टाटा पॉवर आणि टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चरसह समूह कंपन्यांमधील संभाव्य भागविक्रीद्वारे किमान 5,000 हजार कोटी उभारण्याचा विचार करत आहे. मिंटनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

"टाटा समूह टाटांच्या निरनिराळ्या कंपन्यांमध्ये प्रेपरन्शिअल अलॉटमेंटच्या माध्यमातून किंवा पुढील सहा महिन्यांत प्रवर्तक भागविक्रीद्वारे नवीन जारी करून भांडवल उभारण्याचा विचार करत आहे," असं सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.

प्रस्तावित निधी उभारणीचे उद्दिष्ट विशेषत: टाटा न्यू सुपर-अॅप (TataNeu Super-App) व्हेन्चरमध्ये गुंतवणूकीसाठी केलं जाईल, असंही सूत्रांनी सांगितलं.

आपलं संचालक मंडळ परदेशातील खरेदीदारांना त्याच्या पेड-अप इक्विटी कॅपिटलच्या १.५ टक्क्यांप्रमाणे प्राधान्य प्रेफरन्शिअल शेअर जारी करून निधी उभारण्याचा विचार करण्यासाठी बैठक आयोजित करणार असल्याचंही गेल्या आठवड्यात नियामक फाइलिंगमध्ये टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सने सांगितलं.

टाटा समूहाने संभाव्य गुंतवणूकदार म्हणून गोल्डमन सॅक्स आणि जेपी मॉर्गन यांच्याशी संपर्क साधला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निधी उभारणीची प्रक्रिया काही टप्प्यांत पूर्ण केली जाईल. दरम्यान, टाटा सन्सच्या प्रवक्त्यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला.

नियोजित निधी उभारणीचा एक भाग टाटा समूहाचे कर्ज कमी करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. हा निधी टाटा सन्सच्या नवीन उपक्रमाच्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. यामध्ये एअरलाइन कंपनी एअर इंडिया, रिन्यूएबल एनर्जी बिझनेस आणि टाटाचे सुपर-अॅप यांचा समावेश आहे.

टाटा आपला ई-कॉमर्स व्यवसाय अधिक मजबूत करण्याचा विचार करत आहे. यामध्ये TataNeu याचाही समावेश आहे. टाटा समूहाच्या कर्मचार्‍यांसाठी हे आधीच सॉफ्ट-लाँच करण्यात आले आहे आणि सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League 2022) दरम्यान लोकांसाठी अधिकृतपणे लाँच करण्याची योजना आखली जात आहे.

गुंतवणूकदारांकडून इक्विटी भांडवल उभारणीमुळे TataNeu उपक्रमाला बळकटी मिळण्यास मदत होईल आणि ती आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यास तसंच डिजिटल क्षेत्रात प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देण्यास मदत करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

टाटा समूहाचं TATA Neu इ कॉमर्स फर्म Amazon, Walmart-Flipkart आणि मुकेश अंबानी यांच्या RIL डिजिटल व्यवसाय Jio प्लॅटफॉर्मला मोठी टक्कर देऊ शकतो.