“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 02:31 PM2024-05-07T14:31:25+5:302024-05-07T14:32:21+5:30

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: आदित्य ठाकरेला संजय राऊत स्क्रिप्ट लिहून देत आहेत. तुमच्यापेक्षा आम्ही जास्त काळ पक्षात घालवला आहे आणि पक्षासाठी काम केले आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

shiv sena shinde group sanjay shirsat criticized sanjay raut and thackeray group | “ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा

“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू असून, पुढील टप्प्यासाठी प्रचार, बैठकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. यातच आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे तीव्र होताना दिसत आहेत. बारामतीत मतदान होत असून, या मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागले आहे. बारामतीत सुप्रिया सुळे पराभूत होणार आहेत, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. 

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मीडियाशी बोलताना ठाकरे गटावर टीका केली. तसेच बारामतीत होत असलेल्या मतदान प्रक्रियेवर भाष्य केले. सुप्रिया सुळे पराभूत होणार आहेत. नातेसंबंध तुटत नसतात. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे नात तुटणार नाही, हे पवार कुटुंब आहे, असे शिरसाट म्हणाले. तर, रोहित पवार यांनी पराभव मान्य केला आहे. त्यामुळे व्हिडिओ ट्वीट करणे, कोणालातरी धमकवणे आणि शरद पवारांचा वारसदार आहे, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे, हे लोकांच्या लक्षात आले आहे, अशी टीका शिरसाट यांनी केली. 

ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत

बारामती आता केंद्र झाल्याचे ठाकरे गटाचे प्रवक्ते म्हणत आहेत. मातोश्री केंद्र राहिले नाही. आता बारामती झाले आहे. बाळासाहेबांनंतर शरद पवार आहेत.मला असे वाटते की, संजय राऊत हा ठाकरे गटाच्या नेत्यांना जेलमध्ये पाठवण्याची तयारी करत आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे कसे जेलमध्ये जातील याची तयारी संजय राऊत करत आहेत. ठाकरे कुटुंबाला जेलमध्ये टाकायचा आहे, म्हणून राऊत यांचे केंद्र बारामती झाले आहे. शिवसेनाप्रमुखांनंतर प्रभावी नेता उद्धव ठाकरे नसून शरद पवार आहेत हे राऊत यांनी दाखवून दिले आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. 

दरम्यान, आदित्य ठाकरेला संजय राऊत स्क्रिप्ट लिहून देत आहेत. तुमच्यापेक्षा आम्ही जास्त काळ पक्षात घालवला आहे आणि पक्षासाठी काम केले आहे, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला. तसेच असदुद्दीन ओवेसी यांनी सभा घेतली. विषारी मते पेरण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महाविकास आघाडी बरोबर गेलेल्यांना ओवेसी यांनी चपराक लगावली आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.
 

Web Title: shiv sena shinde group sanjay shirsat criticized sanjay raut and thackeray group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.