याला म्हणतात स्वस्तातला धमाका शेअर! 1 लाखाचे केले ₹15 कोटी, आता ₹150 वर जाण्याची शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 12:31 PM2024-03-17T12:31:48+5:302024-03-17T12:40:34+5:30

कंपनीमध्ये 31-डिसेंबर-2023 पर्यंत प्रमोटर्सचा वाटा 64.78 टक्के एवढा होता. तर एफआयआयकडे 10.78 टक्के, डीआयआयकडे 15.27 टक्के एवढा वाटा होता.

शेअर बाजारात, दीर्घकालीन गुंतवणूकदारांना तगडा नफा मिळण्याची शक्यता अधिक असते. आज आम्ही आपल्याला एका अशाच शेअरसंदर्भात माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात छप्परफाड नफा दिला आहे. हा शेअर आहे, संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडचा.

संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडच्या (Samvardhana Motherson International shares) शेअरने दीर्घ कालावधीत तब्बल 138900% हूनही अधिकचा परतावा दिला आहे. या शेअरची किंमत सध्या 111.20 रुपये एवढी आहे. ब्रोकरेजच्या मते या शेअरमध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता आहे.

कधीकाळी केवळ 0.080 पैशांना होता शेअर - संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडचा शेअर 1999 मध्ये 1 पैशांपेक्षाही कमी किंमतीला होता. या शेअरची किंमत आता 111.20 रुपये एवढी आहे. याचाच अर्थ या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 138,900% चा छप्परफाड परतावा दिला आहे.

अर्थात, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 25 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता त्याला 15 कोटी रुपयांपर्यंत बंपर परतावा मिळाला असता. महत्वाचे म्हणजे, गेल्या एका वर्षात या शेअरने 64.01% चा परतावा दिला आहे.

काय म्हणतायत ब्रोकरेज? - ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधर या शेअरवर बुलिश आहे आणि हा शेअर खरेदीचा सल्ला देत आहे. ब्रोकरेजने या शेअरवर 150 रुपये प्रति शेअर टार्गेट प्राइससह काउंटरवर 'बाय' कॉल दिला आहे.

कंपनीने 31-12-2023 ला संपलेल्या तिमाहीसाठी 25752.26 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न नोंदवले आहे. जे गेल्या तिमाहीतील एकूण 23639.16 कोटी रुपये एवढ्या उत्पन्नाच्या तुलनेत 8.94% अधिक आहे.

कंपनीमध्ये 31-डिसेंबर-2023 पर्यंत प्रमोटर्सचा वाटा 64.78 टक्के एवढा होता. तर एफआयआयकडे 10.78 टक्के, डीआयआयकडे 15.27 टक्के एवढा वाटा होता.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)