शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 17:50 IST2025-09-25T17:41:57+5:302025-09-25T17:50:17+5:30

गेल्या काही वर्षांत या शेअरने बाजारात सातत्याने जबरदस्त परतावा देत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे...

शेअर बाजारातून चांगला नफा कमावण्यासाठी संयमाची आवश्यकता असते. महत्वाचे म्हणजे, विद्यमान भू-राजनीतिक परिस्थितीत तर शेअरची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते. आज आम्ही आपल्याला आयएफबी अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज (IFB Agro Industries) च्या शेअरसंदर्भात माहिती देत आहोत.

या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः छप्परफाड परतावा दिला आहे. गेल्या काही वर्षांत या शेअरने बाजारात सातत्याने जबरदस्त परतावा देत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. हा शेअर दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे.

₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी - आयएफबी अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. ऑक्टोबर 2002 मध्ये या कंपनीचा शेअरची किंमत केवळ ₹3.90 एवढी होती. आज, राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) हा शेअर ₹816 पर्यंत पोहोचला आहे.

अर्थात, एखाद्या गुंतवणूकदाराने 21 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये ₹1 लाखाची गुंतवणूक केली असती आणि ती सातत्याने कायम ठेवली असती, तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून सुमारे ₹2.09 कोटी झाले असते.

अशी आहे शेअरची कामगिरी - आयएफबी अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजचा शेअर गुरुवारी 2.53% च्या घसरणीसह ₹821 वर बंद झाला. तरीही, हा पेनी स्टॉक दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. लिस्टिंगपासून आतापर्यंत या शेअरने तब्बल 7,363.64% परतावा दिला आहे.

केवळ दीर्घकालीनच नव्हे, तर अल्पकालीन कालावधीतही या शेअरने उत्तम कामगिरी केली आहे. हा शेअर गेल्या सहा महिन्यांत 71% तर एका वर्षात 44% ने वाढला आहे. याशिवाय, 2025 च्या सुरुवातीपासून (YTD आधारावर) हा शेअर 40.97% वाढला असून, ₹582.40 वरून सध्याच्या पातळीवर पोहोचला आहे.

जून तिमाहीतील निकाल जून तिमाहीत (Q1 FY 2025-26) कंपनीच्या एकत्रित महसूलात तिमाही-दर-तिमाही (QoQ) 34.5% वाढ झाली आहे. वर्ष-दर-वर्ष (YoY) आधारावर कंपनीच्या उत्पन्नात 11.3% वाढ झाली आहे, जी स्थिर प्रगती दर्शवते. मात्र, याच कालावधीत खर्चातही लक्षणीय वाढ झाली असून, खर्च QoQ आधारावर 20.5% आणि YoY आधारावर 5.6% वाढला आहे.

याचा थेट परिणाम कंपनीच्या नफ्यावर झाला आहे. तिमाही-दर-तिमाही आधारावर कंपनीचा निव्वळ नफा 707.1% ने घसरला, तरीही वार्षिक आधारावर नफ्यात 106% वाढ नोंदवली गेली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)