'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 20:57 IST2025-11-17T20:48:42+5:302025-11-17T20:57:21+5:30

शेअर बाजारातील सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेचा (Canara Bank) शेअर सोमवारी मुंबई शेअर बाजारात जवळपास ३ टक्क्यांनी वधाला असून १५०.३५ रुपयांवर पोहोचला आहे. महत्वाचे म्हणजे, बँकेच्या शेअरने साधारणपणे १५ वर्षांतील म्हणजेच २०११ नंतर, हा विक्रमी उच्चांक गाढला आहे.

बँकेचा सर्वकालीन उच्चांक १६४.१९ रुपये असून, ९ नोव्हेंबर २०१० रोजी हा शेअर या पातळीवर होता. महत्वाचे म्हणजे, दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांची यांची कॅनरा बँकेत मोठी गुंतवणूक आहे. त्यांनी सप्टेंबर 2025 तिमाहीत बँकतील आपली गुंतवणूक वाढवली आहे.

८ महिन्यांत ७८% परतावा - कॅनरा बँकेच्या शेअरने गेल्या ८ महिन्यांत ७८ टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. १८ मार्च २०२५ रोजी बँकेचा शेअर ८३.९२ रुपयांवर होता. तो १७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५०.३५ रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या ५ वर्षांचा विचार करता, या शेअरने ७०० टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या कालावधीत हा शेअर १८.६६ रुपयांवरून १५० रुपयांवर पोहोचला आहे. या वर्षाचा विचार करता, या वर्षात या शेअरने ५० टक्क्यांनी वधारला आहे.

रेखा झुनझुनवालांची मोठी गुंतवणूक दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांची कॅनरा बँकेच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक आहे. त्यांच्या जवळ बँकेचे १४२४४३००० शेअर आहेत. बँकेत त्यांचा वाटा 1.57 टक्के एवढा आहे.

शेअरहोल्डिंगचा हा डेटा सप्टेंबर 2025 तिमाहीपर्यंतचा आहे. जुलै-सप्टेंबर 2025 तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांनी बँकेतील आपला वाटा वाढवला आहे. जून 2025 तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कॅनरा बँकेचे १३२४४३००० एवढे शेअर आहेत. बँकेत त्यांचा वाटा 1.46 टक्के होता.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

















