SIP चा सुपरहिट प्लॅन, ३० व्या वर्षी ₹३००० गुंतवा, मिळतील ₹४,५० कोटी; व्याजातूनच मिळतील ₹३.९१ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 09:06 AM2024-03-27T09:06:50+5:302024-03-27T09:13:28+5:30

Best SIP Investment Plan: गुंतवणूक जितक्या लवकर सुरू केली जाईल तितकं चांगलं मानलं जातं. गुंतवणुकीला उशिर झाला असला तरी रणनीती योग्य असेल तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळू शकतो.

Best SIP Investment Plan: गुंतवणूक जितक्या लवकर सुरू केली जाईल तितकं चांगलं मानलं जातं. पण, हा काही नियम नाही. गुंतवणुकीला उशिर झाला असला तरी रणनीती योग्य असेल तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळू शकतो. ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठीही एसआयपी सर्वोत्तम आहे. यासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज नाही.

यासाठी तुम्हाला दररोज १०० रुपये वाचवावे लागतील. इक्विटी म्युच्युअल फंडात (Equity mutual funds) दरमहा ३००० रुपये गुंतवा आणि ही गुंतवणूक ३० वर्षांसाठी करा. यातून तुमचं निवृत्तीचं नियोजनही (Retirement Planning) केलं जाईल. ३० वर्षांनंतर तुमच्याकडे ४.१७ कोटी रुपये जमतील. हे काही नाही. रिटर्न म्हणून केवळ व्याजातून ३.५८ कोटी रुपये मिळतील. जाणून घेऊया संपूर्ण गणित.

लाँग टर्म स्ट्रॅटजी करते काम - जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर लाँग टर्म स्ट्रॅटजी उत्तम काम करते. तुमच्या उत्पन्नातून आवश्यक खर्च काढून टाका आणि नंतर दररोज फक्त १०० रुपये वाचवा. ही बचत दर महिन्याला गुंतवावी लागते. सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment plan) तुम्हाला चांगला रिटर्न मिळवून देईल.

इक्विटी म्युचुअल फंड उत्तम पर्याय - इनव्हेस्टमेंट अॅडव्हायझर्सच्या मते जर तुम्हाला मोठा फंड जमा करायचा असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय असू शकतो. एखाद्या गुंतवणूकदारानं वयाच्या ३० व्या वर्षी ३००० रुपयांची पहिली गुंतवणूक केली आणि ३० वर्षे नियमित गुंतवणूक केली तर एक मोठा फंड तयार होईल. इक्विटी म्युच्युअल फंडाच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (SIP) गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल.

इनव्हेस्टमेंट अॅडव्हायझर्सनुसार तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये ३० वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्हाला अंदाजे १५ टक्के परतावा मिळाला तर तुमचा कोट्यधीश होण्याचा मार्ग सोपा होईल. सर्वात मोठा फायदा म्हणजे चक्रवाढ व्याज. म्हणजे, तुम्हाला ३० वर्षांत १५ टक्के व्याजासह चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळेल. परंतु, सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टेप अप एसआयपीचा. तुम्हाला दर वर्षी फक्त १० टक्क्यांचा स्टेप-अप रेट कायम ठेवायचा आहे.

जर तुम्ही ३० वर्षांचे असाल, दररोज १०० रुपये वाचवा आणि एसआयपीमध्ये ३० वर्षांसाठी गुंतवणूक करा. दरवर्षी १० टक्के स्टेप-अप करत रहा. जर तुम्ही ३००० रुपयांपासून सुरुवात केली असेल तर तुम्हाला पुढील वर्षी ३०० रुपयांनी गुंतवणूक वाढवावी लागेल. ३० वर्षांनंतर तुमची मॅच्युरिटी रक्कम ४,५०,६६,८०९ रुपये असेल. SIP कॅल्क्युलेटरनुसार, ३० वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक ५९,२१,७८५ रुपये असेल.

परंतु, येथे केवळ परताव्यातून मिळणारा नफा ३ कोटी ९१ लाख ४५ हजार ०२५ रुपये असेल. एसआयपीमधील परताव्याची ही जादू आहे. अशा प्रकारे, सर्वात उत्तम फॉर्म्युला स्टेप-अपच्या मदतीनं, तुमच्याकडे ४ कोटी ५० लाख रुपयांचा मोठा निधी असेल. (टीप - यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)