₹2 च्या शेअरचा धमाका! खरेदीसाठी दुसऱ्या दिवशीही गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20%चं अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 02:31 PM2023-12-27T14:31:40+5:302023-12-27T14:45:31+5:30

पेनी शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हा मोठा जोखमीचा निर्णय असतो. पण...

शेअर बाजारात पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करून पैसे कमावण्याचा विचार करणारे अनेक गुंतवणूकदार आहेत. यात अनेक वेळा गुंतवणूकदारांना यश मिळते, मात्र अनेक वेळा मोठे नुकसानही सोसावे लागते.

अर्थात, पेनी शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हा मोठा जोखमीचा निर्णय असतो. मात्र, या आठवड्यात अनेक पेनी शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना आश्चर्य चकित करणारा परतावा दिला आहे.

असाच एक पेनी शेअर म्हणजे, युनिशायर अर्बन इंफ्रा लिमिटेडचा. रियल इस्टेट क्षेत्राशी संबंधित या कंपनीच्या शेअरला बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी 20% पर्यंतचे अपर सर्किट लागले आहे.

शेअरची किंमत - मंगळवारी युनिशायर अर्बन इंफ्राच्या शेअरमध्ये 20% ची तेजी दिसून आली. तर याचे क्लोजिंग 2.46 रुपयांवर झाले होते. तसेच, बुधवारी पुन्हा एकदा या सेअरला 20% चे अपर सर्किट लागले. आणि या शेअरची किंमत 2.95 रुपयांवर पोहोचली.

महत्वाचे म्हणजे, या शेअरने 2 जानेवारी 2023 रोजी 3.15 रुपयांच्या उच्चांकाला स्पर्श केला होता. जून 2023 मध्ये या शेअरची किंमत 1.22 रुपयांवर होती. हा या शेअरचा 52 आठवड्यांतील नीचांक आहे. विशेष म्हणजे, एका आठवड्यात या शेअरने 50 टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली आहे. तर तीन महिन्यांचा याचा परतावा 90 टक्क्यांच्या जवळफास राहिला आहे.

शेअरहोल्डिंग पॅटर्न - युनिशायर अर्बन इंफ्राच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नसंदर्भात बोलायचे झाल्यास, प्रमोटर्सकडे याची तब्बल 18.06 टक्के एवढी हिस्सेदारी आहे. तर, 81.94 टक्के एवढी हिस्सेदारी जनतेकडे आहे.

महत्वाचे म्हणजे, कृती कांतिलाल मेहता, विनय, प्रतीक आणि नूतन मेहत यांचा समावेश आहे. या सर्वांकडे कंपनीचे एकूण 44,00,000 शेअर आहेत.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)