Share Market: 7 रुपयांचा शेअर पोहोचला 910 रुपयांवर; गुंतवणुकदार झाले मालामाल, तुमच्याकडे आहे का..?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 08:52 PM2022-08-10T20:52:34+5:302022-08-10T20:56:11+5:30

शेअर बाजारात गुंतवणूक करणे व्यापार करण्यापेक्षा जास्त धोकादायक आहे. पण, योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यावर तुम्हाला मोठा परतावा मिळू शकतो.

Penny Stock Share Market: शेअर बाजारात पैसे गुंतवणून अनेकांना कोट्याधीश व्हायचे आहे. पण शेअर मार्केटमधून पैसे मिळवणे इतके सोपे नाही. अनेकजण चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करून लाखो रुपयांचे नुकसान करुन घेतात. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, जे लोकांना कोट्यधीश बनवतात.

असा एक शेअर रॅडिको खेतान(Radico Khaitan) कंपनीचा आहे. हा शेअर अवघ्या 7 रुपयांपासून सुरू झाला होता आणि आता 910 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच 19 वर्षात या कंपनीच्या स्टॉकमध्ये 12 हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे एका मार्गाने व्यापार करण्यापेक्षा जास्त धोकादायक आहे. म्हणूनच बाजारातील तज्ज्ञ सांगतात की स्टॉक जास्त काळ स्तःकडे ठेवला पाहिजे. त्यामुळे गुंतवणूकदाराला अधिक नफा मिळण्याची दाट शक्यता असते.

परंतु कोणत्याही स्टॉकमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करून कोणीही धोका पत्करू इच्छित नाही. आज आम्ही तुम्हाला रॅडिको खेतान कंपनीच्या शेअर्सबद्दल सांगणार आहोत. ज्याच्या शेअरने अवघ्या 5 वर्षांत सुमारे 780 रुपयांची उडी घेतली.

तुम्ही 1 वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती तर तुम्हाला 8% परतावा मिळाला असता. म्हणजेच जर तुम्ही वर्षभरापूर्वी रॅडिको खेतान कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते तर तुम्हाला आता 1 लाख 8 हजार रुपये मिळाले असते.

रॅडिको खेतान कंपनीचा हिस्सा गेल्या 5 वर्षांत 500 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर तुम्हाला आता 6 लाख 60 हजार रुपये मिळाले असते.

2003 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 7 रुपये होती. त्यावेळी जर एखाद्या व्यक्तीने या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्या शेअर्सचे मूल्य 1 कोटी 20 लाख रुपये झाले असते.