रतन टाटांच्या कंपनीचा धमाका...! या शेअरनं सर्व विक्रम मोडले; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 07:35 PM2023-07-08T19:35:09+5:302023-07-08T19:45:44+5:30

बाजारातील तेजी बरोबरच टाटा समूहाच्या शेअरमध्येही जबरदस्त तेजी दिसून आली आहे...

टाटा समूहाच्या अनेक शेअर्सनी आपल्या गुतंवणूकदारांना बम्पर परतावा दिला आहे. या शेअर्समध्ये गुंतवमूक करणारे आता मालामाल झाले आहेत. बाजारातील तेजी बरोबरच टाटा समूहाच्या शेअरमध्येही जबरदस्त तेजी दिसून आली आहे.

टाटा समूहाची कंपनी असलेल्या टाटा मोटर्सच्या (Tata Motors) शेअर्समध्ये सध्या जबरदस्त तेजी दिसत आहे. या शेअरने तेजीचे सर्व विक्रम मोडले आहेत. टाटा मोटर्सचा शेअर या आठवड्याच्या अखेरच्या कामकाजाच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी 4 टक्क्यांनी वाढून 624.65 रुपये या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता.

जून 2023 मध्ये संपेलेल्या तिमाही दरम्यान कंपनीकडून जग्वार-लँड रोव्हर अर्थात जेएलआरच्या विक्री अहवालानंतर, ही वाढ दिसून आली आहे. हा शेअर 618.45 रुपयांवर बंद झाला आहे. या शेअरमध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक कराणारे गुंतवणूकदार आज कोट्यधीश झाले आहेत.

गुंतवणूकदार मालामाल - टाटा समूहाच्या कंपनीची एकूण देशांतर्गत विक्री एक टक्क्याने वाढून 80,383 युनिट्सवर पोहोचली आहे. गेल्या एक वर्षापूर्वी याच महिन्यात ही विक्री 79,606 युनिट होती. याच बरोबर, कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. कंपनीचे मार्केट कॅप वाढून जवळपास 2 लाख कोटी रुपये एवढे झाले आहे.

टाटा मोटर्सचा शेअर 26 डिसेंबर 2022 रोजी 52 आठवड्यांतील निचांकी पातळीवर म्हणजेच 375.50 रुपयांवर होता. अर्थात गेल्या एका वर्षात टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये 42 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांत हा शेअर 462 टक्क्यांनी वधारला आहे.

कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ - टाटा मोटर्सचा मागील उच्चांक 606 रुपये एवढा होता. 7 जुलै रोजी टाटा मोटर्सच्या शेअरने हा उच्चांक मोडला. कंपनीच्या मते, जग्वार-लँड रोव्हरची होलसेल बिक्री (चीनमधील विक्री वगळता) पहिल्या तिमाहीत 93,253 युनिट आहे. ही विक्री गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी अधिक आहे.

गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत विदेशी बाजारात कंपनीच्या विक्रीत सर्वाधिक 83 टक्क्यांची वाढ झाली आहे. टाटा मोटर्सने म्हटल्यानुसार, तिमाहीच्या अखेरीस 1,85,000 हून अधिक ऑर्डरसह त्यांची ऑर्डर बुकिंग मजबूत झाली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)