SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खूशखबर! आता घरबसल्या होणार कामं; जाणून घ्या नेमकं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 02:49 PM2022-07-04T14:49:10+5:302022-07-04T14:57:26+5:30

State Bank of India : एसबीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन टोल फ्री नंबर (Tool Free Number) जारी केला आहे. या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून ग्राहकांना घरबसल्या बँकांशी संबंधित कामं झटपट करता येणार आहेत.

ग्राहकांना यापुढे बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. फक्त तेच ग्राहक या टोल फ्री क्रमांकाचा लाभ घेऊ शकतात. ज्याचा मोबाईल क्रमांक हा नोंदणीकृत आहे हे लक्षात ठेवा की असं म्हटलं आहे.

एसबीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. एसबीआयच्या या नवीन टोल फ्री क्रमांकामुळे ग्राहकांना रविवार किंवा सुट्टीच्या दिवशीही बँकिंग सेवेचा लाभ घेता येणार आहे.

आता एसबीआयचे ग्राहक घरबसल्या बँकेशी संबंधित अनेक कामे मार्गी लावू शकतील. SBI चा नवीन टोल फ्री नंबर जाणून घ्या SBI ने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन टोल फ्री नंबर जारी केले आहेत.

1800 1234 आणि 1800-2100 या क्रमांकांवर कॉल करून तुम्ही बँकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकता. खात्यातील अंतिम शिल्लक जाणून घेण्यासाठी SBI ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल फोनवरून बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात.

ग्राहक हे मागील 5 वेळा केलेले व्यवहारांचे तपशील देखील जाणून घेऊ शकता. नोंदणीकृत नंबरवरून कॉल करून, तुम्ही एटीएम कार्ड ब्लॉकिंग आणि डिस्पॅच स्थितीबद्दल माहिती मिळवू शकता.

जर तुमचे नवीन एटीएम कार्ड आले असेल, तर या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून त्यासाठीचा पिनही तयार केला जाऊ शकतो. एसबीआयचे हे नंबर वापरण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला शाखेत जाण्याची गरज नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.