Salary Calculator : पगार मिळताच 'हे' काम करा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 04:57 PM2022-12-04T16:57:24+5:302022-12-04T17:03:00+5:30

Salary Calculator : सध्या महागाई इतकी वाढली आहे की लोकांचा खर्च भागत नाही आणि लोकांचा पगारही संपतो. अशा परिस्थितीत पगार मिळताच लोकांनी काही पावले उचलली पाहिजेत.

नवी दिल्ली : सध्या महागाई इतकी वाढली आहे की, लोकांचा खर्च भागत नाही. महिना संपायच्या आत पगारही संपतो. अशा परिस्थितीत लोकांनी पगार मिळताच काही निर्णय घेणं गरजेचं आहे. अन्यथा महिना अखेर काही शिल्लक उरणार नाही.

सध्या व्यावसायिकांपेक्षा नोकरदार वर्ग सर्वाधिक आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना महिना संपल्यानंतर पगार दिला जातो. सध्या महागाई इतकी वाढली आहे की लोकांचा खर्च भागत नाही आणि लोकांचा पगारही संपतो. अशा परिस्थितीत पगार मिळताच लोकांनी काही पावले उचलली पाहिजेत, अन्यथा सर्व पैसे संपू शकतात.

पगारातील पैशांची बचत करणे ही एक कला आहे. पण पगार मिळताच लोक पैसे खर्च करतात. दुसरीकडे, गुंतवणुकीकडे कानाडोळा करतात. अशा स्थिती असेल वेळीच सावध राहणे गरजेचे आहे.

चुकीच्या धारणेनुसार लोक पगार झाला की, आपला खर्च भागवतात आणि मग महिन्याच्या शेवटी पगारातून जे पैसे वाचतील त्यातून गुंतवणूक करतात. पण यामुळे बचत किंवा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक होऊ शकत नाही.

पगार येताच लोकांनी पहिल्यांदा बचत आणि गुंतवणुकीला दिले पाहिजे. बचतीची रक्कम बाजूला काढून खर्च भागवण्याच्या दिशेने पावले उचलली पाहिजेत. जर तुम्ही असे केले नाही तर संपूर्ण पगार संपू शकतो आणि नंतर बचत किंवा गुंतवणूक करता येणार नाही.

पगार येताच बचत आणि गुंतवणुकीला प्राधान्य दिल्याने अनावश्यक खर्चालाही आळा बसेल. तसेच, संपूर्ण महिन्यात कोणते खर्च प्राधान्याने राहतील आणि कोणते खर्च केले नाहीत तरी चालतील, यावर लक्ष राहील. अशा परिस्थितीत पगार येताच तात्काळ बचत आणि गुंतवणुकीला प्राधान्य द्यायला हवे.