Reliance Jio च्या या प्लॅनमध्ये मिळतो १० रूपयांपेक्षाही कमी किंमतीत रोज 3GB डेटा, फ्री कॉलिंग आणि अनेक फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 06:32 PM2021-09-14T18:32:31+5:302021-09-14T18:37:07+5:30

Reliance Jio : पाहा कोणता आहे हा प्लॅन आणि कोणते मिळतायत फायदे

सध्या Reliance Jio, Airtel, Vodafone-Idea सारख्या कंपन्या आपल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवे प्लॅन्स ऑफर करत आहेत. जर तुम्ही अधिक डेटा वापरत असाल तर तुम्हाला दररोज 3GB पर्यंत डेटा देणारा प्लॅनही कंपनीकडे आहे. या प्लॅनची सुरूवात 349 रूपयांपासून होते.

याशिवाय कंपनीकडे सर्वाधिक किंमतीचा 3499 रूपयांचाही एक प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 3GB डेटा आणि त्यासोबत मोफत कॉलिंग आणि अन्य फायदेही देण्यात येतात. पाहूया या प्लॅन्समध्ये काय काय मिळतं.

रिलायन्स जिओच्या 349 रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची वैधता मिळते. तसंच या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 3GB डेटा देण्यात येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकून 84GB डेटा देण्यात येतो.

या प्लॅनसोबत ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचाही फायदा देण्यात येतो. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा आणि मोफत जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.

499 रूपयांच्या प्लॅनमध्येही ग्राहकांना दररोज 3GB डेटा देण्यात येतो. तसंच या सोबत ग्राहकांना 6GB अतिरिक्त डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये एकूण 90 GB डेटा देण्यात येतो. या प्लॅनची वैधतादेखील 28 दिवसांची आहे. या प्लॅनसोबत ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगची सुविधा देण्यात येते. तसंच ग्राहकांना दररोज 100 SMS आणि Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना 999 रूपयांचाही एक प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्येही ग्राहकांना दररोज 3GB डेटा दिला जातो. तसंच या प्लॅनमध्ये एकूण 252GB डेटा देण्यात येतो. या प्लॅनमध्ये मोफत कॉलिंगचाही फायदा मिळतो. तसंच दररोज 100 SMS आणि जिओ अॅप्सचंही सबस्क्रिप्शन मिळतं.

याशिवाय कंपनी वर्षभराची वैधता असलेला 3499 रूपयांचाही प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनची वैधता 364 दिवस इतकी आहे. या प्लॅनमध्येही ग्राहकांना 3GB डेटा मिळतो.

या प्लॅनमध्ये एकूण 1095GB डेटा देण्यात येतो. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ अॅप्स तसंच जरर 100 एसएमएसचीही सुविधा देण्यात येते.